खेड : सुकिवलीतील विद्युत पुरवठा पूर्ववत

Jun 17, 2024 - 10:33
Jun 17, 2024 - 15:37
 0
खेड : सुकिवलीतील विद्युत पुरवठा पूर्ववत

खेड : तालुक्यातील सुकिवली येथील विद्युत रोहित्रामध्ये अचानक बिघाड होऊन शनिवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास विद्युत पुरवठा खंडित झाला होता. रविवारी दुपारी १ वा.च्या सुमारास तब्बल २० तासांनी पूर्ववत करण्यात यश आल्याने येथील ग्रामस्थानी निःश्वास टाकला.

सुकीवली चोरद नदी पात्रा नजीक असलेला विद्युत रोहित्र शनिवारी दि.१५ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास अचानक जळाला याबाबतची माहिती संबंधित वायरमन यांना देण्यात आली त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. मात्र, विद्युत रोहित्र बसवण्यांसाठी उपाययोजना करणे तत्काळ आवश्यक असताना ती न करण्यात आल्याने येथील चार वाड्यांमधील ग्रामस्थांना अंधारात चाचपडत रहावे लागले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:02 PM 17/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow