किमान पेन्शनसाठी रत्नागिरी येथे समिती स्थापन

Jun 18, 2024 - 12:49
 0
किमान पेन्शनसाठी रत्नागिरी येथे समिती स्थापन

त्नागिरी : सर्व अशासकीय कामगारांसाठी महागाईशी निगडित किमान पेन्शन कायदा लागू करण्याची मागणी करण्यात येत असून रत्नागिरी येथे यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे.

देशाच्या उभारणीसाठी काबाडकष्ट करणारी महामंडळे, खासगी कंपन्या, कंत्राटी कामगारांना आयुष्यभर सर्व करांचा भरणा करूनही हलाखीत जीवन जगावे लागते. समान शैक्षणिक अर्हता, समान कामाचे स्वरूप असूनही या अशासकीय कामगारांना पेन्शनपासून वंचित ठेवले गेले आहे. किमान पेन्शन कायद्याची आवश्यकता आणि व्यवहार्यता याबद्दल चर्चा होऊन अपुरी FPS/EPS 95 योजना, त्या अनुषंगाने न्यायालयीन निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत होणारी दिरंगाई पाहता मरेपर्यंत सन्मानाने जगण्यासाठी किमान पेन्शन कायदा लागू व्हावा, अशी आग्रही मागणी करण्यात येत आहे. एमएसईबी, एसटी महामंडळ, नर्मदा सिमेंट, फिनोलेक्स आदी खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगाराचेऊ प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.

यावेळी समिती सहभागासाठी कोणतीही वर्गणी गोळा करू नये, परंतु होणारा खर्च स्वतः करावा, असा निर्णय सर्वानुमते घेतला गेला आहे. समितीतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असा कायदा करण्याबाबत निवेदन जिल्हानिहाय उपसमित्या स्थापन करून त्या त्या जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात येणार असून ज्येष्ठ नागरिक दिनी लक्षवेधी आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा समितीने केली.

नारायण आजगावकर यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला हेमंत आपटे, दिलीप शेट्ये, नाटेकर, सुरेंद्र साळवी, प्रकाश देसाई, संजय साळवी, नारायण आजगावकर आदी विविध आस्थापनांतील निवृत्त कर्मचारी उपस्थित होते. या प्रकरणी लवकरच पुन्हा बैठक घेतली जाणार असल्याचे समितीकडून सांगण्यात आले.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 18-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow