संजय राऊत यांनी रोखठोकमधून आकलेचे तारे तोडले : चंद्रशेखर बावनकुळे

May 27, 2024 - 15:37
May 27, 2024 - 15:39
 0
संजय राऊत यांनी रोखठोकमधून आकलेचे तारे तोडले : चंद्रशेखर बावनकुळे

◼️ संजय राऊत भ्रमिष्ट अवस्थेत ‘रोखठोक‘ लिहित असावेत

◼️ २०१९ मध्ये राऊतांनी मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न केले होते

◼️ हिंमत असेल तर एक रोखठोक त्यावरही येऊ द्या - चंद्रशेखर बावनकुळे

◼️ आयुष्यभर गटातटाचं राजकारण केलं त्या संजय राऊतांना परिवार काय कळणार?

मुंबई : उबाठाचे अधिकृत आणि शरद पवार गटाचे स्वयंघोषित प्रवक्ते संजय राऊत यांनी आज पुन्हा अकलेचे तारे तोडत भाजपच्या अंतर्गत राजकारणावर भाष्य केलं आहे. राऊत हे उद्धव ठाकरे यांचे कर्मचारी आहेत पण ते शरद पवार यांची चाकरी करतात. ते भ्रमिष्ट अवस्थेत ‘रोखठोक‘ लिहित असावेत. भाजप हा पक्ष नाही तर परिवार आहे. ज्यांनी आयुष्यभर गटातटाचं राजकारण केलं त्या संजय राऊतांना परिवार काय कळणार? अशी टीका भाजपा एक्सवरून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.

आदरणीय मोदीजी, अमित भाई, योगीजी, नितीनजी, देवेंद्रजी हे भाजपच्या एकाच परिवारातील सदस्य आहेत. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः हे मूल्य घेऊन भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता काम करतो. पण संजय राऊतांच्या बाबतीत प्रथम शरद पवार नंतर स्वतः आणि शेवटी उद्धव ठाकरे आणि उबाठा गट असा क्रम आहे. त्यामुळे राऊतांच्या डोक्यातून असंच काहीतरी बाहेर पडणार. 

२०१९ मध्ये स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी संजय राऊतांनीही प्रयत्न केले होते. पण त्यांचा डाव यशस्वी झाला नाही. हिंमत असेल तर एक ‘ रोखठोक‘ त्यावरही येऊ द्या!
https://x.com/cbawankule/status/1794609241983946888?s=46&t=yN4NDAcqXYHcL_Rp6w09WQ

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:37 27-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow