लांजातील समस्यांबाबत शहर समन्वय समितीने घेतली मुख्याधिकाऱ्यांची भेट

Jun 21, 2024 - 14:38
 0
लांजातील समस्यांबाबत शहर समन्वय समितीने घेतली मुख्याधिकाऱ्यांची भेट

लांजा : लांजा शहराच्या विकासासाठी स्थापन झालेल्या लांजा शहर समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी १८ जून रोजी लांजा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी हर्षला राणे यांची भेट घेतली, यावेळी त्यांनी लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील विविध समस्यांसंदभांत चर्चा केली.

लांजा शहरातील विविध समस्यांसंदर्भात लांजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींची लांजा शहर समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समन्वय समितीच्या पदाधिका-यांनी मंगळवार, दि. १८ जून रोजी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी हर्षला राणे यांची भेट घेऊन लांजा शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यासंदर्भात चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने नगरपंचायत हद्दीतील अनेक रस्त्यांची सध्या दुरवस्था झालेली असून अनेक ठिकाणी गटारांची साफसफाई झालेली नसल्याने तुंबलेल्या गटारांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

त्याचप्रमाणे शहरात मोकाट गुरे आणि कुत्र्यांचा उपद्रजदेखील बाढला आहे, त्यामुळे अपघातांच्या संख्यादेखील वाढ होत आहे. याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.

तसेच शहरातील ज्या ज्या ठिकाणी निवासी संकुले आहेत अशा निवासी संकुलांचा सांडपाण्याचा प्रश्न गंभीर आहे. अनेक संकुलांनी आपले सांडपाणी हे नजीकच्या वहाळत सोडलेले आहे. त्यामुळे प्रदूषणाचा धोका अधिक असून भविष्यात निवासी संकुल रहिवासी किंवा बिल्डर यांना परवानगी देताना येथील सांडपाण्याचा प्रश्न सोडवला आहे का? हे पाहूनच परवानगी द्यावी, अशी मागणी केली. तसेच शहरात अनधिकृत घरांची संख्यादेखील आहे. नगरपंचायतीकडून अनधिकृत घरे म्हणून घरपट्टी आकारली जाते. त्या तुलनेत त्यांना वीज मीटर किंवा नळ जोडणी व अन्य सेवा सुविधा मिळत नाहीत. याचा विचार करून अशा अनधिकृत घरांना कायदेशीर परवानगी मिळण्याच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही करण्याची मागणीदेखील यावेळी करण्यात आली. याबरोबरच शहरातील अनेक विविध समस्या व विषयांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी प्रशासकीय अधिकारी अविराज पाटील यांनी याबाबत योग्य तो तोडगा काढून समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन शहर समन्वय समितीला दिले. याप्रसंगी शहर समन्वय समितीचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये, उपाध्यक्ष प्रकाश लांजेकर, उपाध्यक्ष सुधाकर कांबळे, सचिव चंद्रशेखर स्वामी, सहसचिव निरंजन देशमुख, अभिजित जेधे, जयवंत शेट्ये, विजय कुरूप, सचिन लिंगायत, राजेश राणे, सुधाकर लांजेकर आदीसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:06 PM 21/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow