रत्नागिरी : जिल्ह्यात वीजवितरणातील गळतीचे प्रमाण १२ टक्के; १० ते १२ कोटींचा महावितरणला फटका

Jun 21, 2024 - 16:40
Jun 21, 2024 - 16:41
 0
रत्नागिरी :  जिल्ह्यात वीजवितरणातील गळतीचे प्रमाण १२ टक्के;  १० ते १२ कोटींचा  महावितरणला   फटका

रत्नागिरी : महावितरण कंपनीने वीज वितरणचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत. तरी आजमितीला महावितरण कंपनीच्या वितरण व्यवस्थेमध्ये वीजेची १२ टक्के गळती होत असल्याचे पुढे आले आहे. आर्थिकदृष्या ही गळती सुमारे १० कोटींच्या घरात आहे. गळती कमी करण्यासाठी फिटरणधील अंतर कमी करणे, उच्च व लघुदाबाबच्या वाहिन्या बदलणे आणि ताणण्याचे काम हाती घेतले आहे. 

महावितरणच्या ग्राहकांना चांगल्या दाबाने आणि अखंडित विद्युतपुरवठा करण्यासाठी नव्याने ९६६ कोटींचा प्रस्ताव पाठवला आहे. यामध्ये २१ नवीन उपकेंद्रांचा प्रस्तावासह २८ हजार नवीन विद्युत खांबांचा समावेश आहे. यामुळे महावितरण ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याच्या उद्देशाने पावले टाकत आहे. नवीन प्रस्तावातील पायाभूत सुविधा कार्यन्वित झाल्या महसुल देणाऱ्या घरगुती, वाणिज्य तसेच औद्योगिक ग्राहकांची विनाव्यत्यय वीज
वितरण करणे शक्य होणार आहे. जिल्ह्यात महावितरण कंपनीची ५५ उपकेंद्र आणि १९५ फिडर्स आहेत. त्यांच्या माध्यमातून सुमारे ५ लाख ८० हजार ग्राहकांना विद्युतपुरवठा केला जातो.

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महावितरण नवीन २१ उपकेंद्र उभारणार आहे. १०० मीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतर असलेल्या भागात ही उपकेंद्र उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे अंतर कमी होऊन ग्राहकांची संख्या मर्यादित राहिल. त्यांना योग्य दाब आणि विनाखंडित विद्युत सेवा देता येणार आहे. तसेच विजेची गळतीही कमी होणार आहे. महावितरणचा महसूल १०० कोटींच्या दरम्यान आहे. परंतु, १२ टक्के वीज गळती असल्याने १० ते १२ कोटींचा तोटा महावितरणला सहन करावा लागत आहे.

महावितरणच्या वितरण व्यवस्थेमध्ये सुमारे १२ टक्के वीज गळती आहे. ही गळती कमी करण्याच्यादृष्टीने पायाभूत सुविधांच्या मजबुतीकरणावर भर दिला जात आहे. फिडरचे अंतर कमी करून गळती कमी करण्याचा प्रयत्न आहे. - एन. एम. पळसुले-देसाई, कार्यकारी अभियंता (प्रशासन)

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:08 PM 21/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow