खेड : सोनगावात संरक्षक भिंत कोसळून घर जमीनदोस्त

Jun 22, 2024 - 09:57
Jun 22, 2024 - 10:02
 0
खेड :  सोनगावात संरक्षक भिंत कोसळून घर जमीनदोस्त

खेड : खेड शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागाला पावसाने चांगलेच झोडपून काढले, गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसात सोनगाव भोईवाडी येथील दिलीप धोंडू दिवेकर यांच्या घराच्या मागील बाजूच्या संरक्षक भिंतीसह घराचा काही भाग खालील बाजूला असलेल्या पुष्पा महादेव पारधी यांच्या घरावर कोसळल्याने पारधी यांचे घर जमीनदोस्त झाले आहे. या घटनेमध्ये श्रीमती पारधी या जखमी झाल्या असून, त्यांच्यावर नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

सोनगावातील दुर्घटनेमध्ये श्रीमती पारधी यांच्या घरासह घरातील भांडी, टीव्ही, गॅस शेगडी, सिलिंडर, लोखंडी कपाट यांसह अन्य वस्तू असे मिळून सुमारे १ लाख ३७ हजार २०० रुपयांचे नुकसान झाले असून, संपूर्ण घर जमीनदोस्त झाल्यामुळे घराच्या इमारतीचे पाच लाखांचे नुकसान झाले आहे. एकूण ६ लाख ३७ हजार २०० रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात पावसाने चांगलेच झोडपून काढले. या पावसामुळे खेडमधील जगबुडी नदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली असून, गुरवारी रात्रीपासून जगबुडी नदीं ही इशारा पातळीवरून (५.२५) वाहत होती. शुक्रवारी  सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास (५.०५), तर सकाळी अकरानंतर पावसाने थोडी उसंत घेतल्याकारणाने जगबुडी नदीची पाणीपातळी कमी होऊन (४.७५) अशी झाली होती, तर नारंगी नदीसुद्धा दुथडी भरून वाहू लागली होती. पावसामुळे खेड शहरातील गटारे तुंबली, त्यामुळे रस्त्यावरून मार्ग काढताना वाहनचालकांची तारांबळ उडाली, वटपौर्णिमच्या निमित्ताने बाजारात खरेदीसाठी आलेल्या महिलावर्गाचीही त्रेधा उडालेली दिसून आली. ग्रामीण भागातील जनजीवनही विस्कळीत झाले होते. पावसामुळे वीजपुरवठादेखील खंडित झाला होता. सकाळयासून पावसाने उसंत घेतल्याने वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. अन्य काही ठिकाणी नुकसान झालेले आहे. त्या ठिकाणी महसूल विभागामार्फत पंचनामे सुरू आहेत.

ग्रामीण भागात शेतीच्या कामांना वेग
सुरुवातीला रिमझिम असलेल्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरीराजा सुखावला आहे. आज दिवसभरात १४६.९० मि.मी. पावसाची नोंद झाली असून, एकूण पाऊस ४६४ मि.मी. झाला आहे. खेड तालुक्याच्या ग्रामीण भागात शेतीच्या कामांनी वेग धरला असून, पावसाच्या जोरदार आगमनामुळे पेरणीची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. आज सकाळी अकरानंतर मात्र पावसाने घेतल्याने जगबुडीसह नारंगी नदीच्या पाणीपातळीत काहीशी घट झाली आहे. 

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 22/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow