रत्नागिरीत मोकाट गुरांचा प्रश्न ऐरणीवर..

Jun 22, 2024 - 12:09
 0
रत्नागिरीत मोकाट गुरांचा प्रश्न ऐरणीवर..

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील मोकाट गुरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

या मोकाट गुरांमुळे एका समाज कंटकाने शुक्रवारी सोशल मीडियावर भावना दुखावल्या जातील अशी एक पोस्ट व्हायरल केली. त्यामुळे सकल हिंदू संस्थेन या तरुणा विरोधात तक्रार देण्यासाठी शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. रत्नागिरी शहरामध्ये जागोजागी रस्त्यावर ठिय्या मांडून बसलेली गुरे दिसून येत असतात. त्यामुळे काही वेळा अपघात होऊन काही जणांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. बुधवारीच शिरगाव- गणेशवाडी येथे रस्त्यालगतच्या भूमिगत डीपीच्या अर्थिगचा शॉक लागून एका मोकाट गुराचा मृत्यू झाला होता. न.प.चे दुर्लक्ष होत असल्याने शहरात मोकाट गुरांचा त्रास सतत वाढत आहे. या मोकाट गुरांच्या प्रश्नावरुनच संशयित तरुणाने 'गाय हमारी माता है बोलने वाले भक्तों बारिश मे इन्हे अपने घर ले जाओ 'अशी पोस्ट केली होती. 

या पोस्टनंतल सकल हिंदू संस्थेने शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:38 22-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow