संगमेश्वर : कडवई येथे घरावर झाड कोसळून नुकसान

Jun 26, 2024 - 11:06
 0
संगमेश्वर : कडवई येथे घरावर झाड कोसळून नुकसान

संगमेश्वर : गेले चार दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने कडवई मुस्लिम मोहल्ल्यातील साजिदा अहमद जुवळे याच्या घरावर शेजारी राहणाऱ्या सिकंदर मुल्ला यांचे फणसाचे झाड कोसळल्याने घराचे फार नुकसान झाले. सुदैवाने झाड कोसळले तेव्हा घरातील सदस्य आतल्या खोलीत असल्याने कोणाला काही इजा झालो नाही; परंतु घराच्या दोन खोल्यांची कौले व पाण्याची टाकी फुटून सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले. कौले फुटल्याने घरात पावसाचे पाणी घुसून घरातील वस्तूंचे नुकसान झाले. तलाठी किशोर तांबे व सहकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला. उपसरपंच दत्ताराम ओकटे उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 AM 26/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow