खेड : लोटे पंचक्रोशीत विजेचा लपंडाव

Jun 26, 2024 - 14:24
 0
खेड : लोटे पंचक्रोशीत विजेचा लपंडाव

खेड : गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोटे पंचक्रोशीत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. 

पावसाळ्यापूर्वी 'महावितरण'ने देखभालीच्या नावाखाली सातत्याने वीजपुरवठा खंडित करत ग्रामस्थांना हैराण केले होते. मॉन्सूनपूर्व कामे पूर्ण झाल्याचा दावा करणाऱ्या 'महावितरण'च्या गलथान कारभाराचे नमुने पुढे येत आहेत. सतत वीजपुरवठ्यात येणाऱ्या व्यत्ययामुळे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसह ग्रामस्थ मेटाकुटीस आले आहेत. 'महावितरण'ने कारभारात सुधारणा न केल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता 'महावितरण'वर धडक देण्याच्या विचारात ग्रामस्थ आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:44 26-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow