देवरुख येथे भाजपने जागवल्या आणीबाणीच्या आठवणी..

Jun 27, 2024 - 11:54
Jun 27, 2024 - 12:00
 0
देवरुख येथे भाजपने जागवल्या आणीबाणीच्या आठवणी..

साडवली : एकीकडे लोकशाही वाचवण्यासाठी लढत असल्याचे चित्र उभे करायचे आणि चारशे पार झाल्यानंतर संविधानात बदल करणार असल्याचा समाजात संभ्रम निर्माण करून निवडणुका लढवायच्या हे तंत्र वापरणाऱ्या कॉंग्रेस आणि त्यांच्या सहयोगी घटक पक्षांनी कधीकाळी देशावर आणीबाणी लादून देशातील लोकशाहीला नख लावले होते. महान भारतीय संविधानाची पायमल्ली केली होती. याची आठवण आणि त्या घटनेचा निषेध करत संगमेश्वर (दक्षिण) मंडळातील भाजप पदाधिकाऱ्यांनी काळा दिन म्हणून निषेध नोंदविला.

महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष राकेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा निषेध कार्यक्रम देवरुख येथे झाला. देवरुख येथील ज्येष्ठ कार्यकर्ते मुकुंद जोशी यांनी पास कालावधीत तुरंगवास भोगला होता. जवळपास १६ महिने तुरुंगात होते. त्यांच्याबरोबर तिथे प्रमोद महाजन, मोहन भारिया हे देखील नाशिकच्या तुरंगामध्ये होते तसेच सेवानिवृत्त शिक्षक शशिकांत अळवणी हे नाशिक येथे १३ महिने कारावासात होते. जेव्हा अळवणी तुरुंगात गेले त्या वेळेला त्यांच्या पत्नी सात महिन्यांच्या गरोदर होत्या मात्र इंदिरा गांधी यांच्या सरकारने व पोलिसांनी जोशी, अळवणी आणि त्यांच्यासारख्या असंख्य निरपराध लोकांना कोणतीही दयामाया न दाखवता तुरुंगात डांबून ठेवते, असा अनुभव त्या दोघांनीही याप्रसंगी सांगितले. जोशी आणि अळवणी यांचा त्याग आदर्शवत असल्याने भाजपच्या नव्या दमाच्या कार्यकत्यांनी त्यांचा सन्मान केला.

या कार्यक्रमासाठी संगमेश्वर दक्षिण तालुकाध्यक्ष रूपेश कदम यांनी मोलाचे सहकार्य केले. महिला मोर्चा तालुकाध्यक्षा स्नेहा फाटक यांनी या कामाचे नियोजन केले. महिला मोर्चा तालुका सरचिटणीस स्वाती गोडे, तालुका सरचिटणीस राहुल फाटक, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुधीर यशवंतराव, कार्यकारिणी सदस्य दत्ता नार्वेकर, शहराध्यक्ष सुशांत मुळे आणि सुमेध भरडे उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 PM 27/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow