मंडणगड : टाकवलीत दीड तासांत दागिने चोरास बेड्या

Jun 29, 2024 - 11:05
Jun 29, 2024 - 12:07
 0
मंडणगड : टाकवलीत दीड तासांत दागिने चोरास बेड्या

मंडणगड : तालुक्यातील अडखळ ग्रुप ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच यांच्या टाकवली गावातील बंद घरातील सोन्याचे दागिने चोरी करून पलायन करण्याच्या तयारीत असलेल्या चोरास दीड तासांत सापळा रचून अटक केली. चोराने लपवून ठेवलेला एक लाख साठ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

याबाबत मंडणगड पोलिस ठाण्यातून प्राप्त माहितीनुसार, करिना कल्पेश रक्ते (रा. टाकवली) यांनी २७ जूनला चोरीची तक्रार दाखल केली होती. त्या २७ जूनला सकाळी नेहमीप्रमाणे घर बंद करून गावातील शेतामध्ये शेतीच्या कामासाठी गेल्या होत्या. संध्याकाळी सहाच्या सुमारास त्या घरी आल्या असता घराचा समोरील दरवाजा उघडा दिसला. दरवाजाचे कुलूप खाली पडलेले दिसले. त्यांनी घरामंध्ये शिरून पाहिले असता कपाटात ठेवलेले सुमारे एक लाख सात हजारांचे सोन्याचे दागिने व दोन हजारांचा मोबाईल चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ मंडणगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल झाल्यानंतर रात्री नऊनंतर पोलिस हेडकॉन्स्टेबल दत्ताराम बाणे यांनी तपास सुरू केला. मंडणगड बसस्थानकाच्या आवारात रात्री एकच्या सुमारास एक इसम संशयितरित्या फिरताना दिसून आला. विचारणा करताना त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडे टाकवली येथील चोरीचा मुद्देमाल आढळला. त्यामुळे अंकुश दौलत रेवाळे (वय ४२, रा. टाकवली) याला अटक केली. तपास निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली नामदेव शिंदे, दत्ताराम बाणे, एस. पी. मावची, वैभव गमरे, रमेश जाधव, सत्यजित बिजन यांनी केला.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:33 PM 29/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow