लांजा : धनावडे स्टॉप येथील दरड धोकादायक

Jul 1, 2024 - 12:09
Jul 1, 2024 - 12:14
 0
लांजा : धनावडे स्टॉप येथील दरड धोकादायक

लांजा : मुंबई-गोवा महामार्गावर धनावडे स्टॉप या ठिकाणी डोंगरावर असलेली भलीमोठी दरड धोकादायक बनली असून, सध्या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ती खाली कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी देवधे धनावडे स्टॉप या ठिकाणी डोंगराचे कटिंग करण्यात आले आहे. यापूर्वी या डोंगरावरील काही दरड आणि माती मुंबई-गोवा महामार्गावर खाली कोसळली होती; मात्र त्या वेळी नव्याने तयार करण्यात येत असलेल्या महामार्गाच्या कामामुळे या नवीन मार्गावरून वाहतूक सुरू नव्हती. सध्या या नवीन मार्गावरून वाहतूक सुरू आहे. अशा परिस्थितीत या ठिकाणी महामार्गाचे वरील भागात डोंगरावर असलेली भलीमोठी दरड धोकादायक स्थितीत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:37 PM 01/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow