रत्नागिरीतील लो. टिळक मेमोरियल ग्रंथालयाच्या निधी वितरणास मान्यता

Jul 1, 2024 - 14:13
Jul 1, 2024 - 17:04
 0
रत्नागिरीतील  लो.  टिळक मेमोरियल ग्रंथालयाच्या निधी वितरणास मान्यता

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील शासकीय विभागीय ग्रंथालय असलेल्या लोकमान्य टिळक मेमोरियलची नुकतीच दुरुस्ती, नूतनीकरण, सुशोभीकरण व आधुनिकीकरणाच्या कामाला मिळालेल्या निधीपैकी ३ लाख ९१ हजारांच्या निधी वितरणाला शासनाने परवानगी दिली आहे. यापूर्वी ४ कोटी २१ लाख ९ हजारांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृती शताब्दी उपक्रमांतर्गत रत्नागिरीतील लोकमान्य टिळक मेमोरियल या शासकीय विभागीय ग्रंथालयाच्या देखभाल दुरुस्ती, नुतनीकरण, सुशोभिकरण व आधुनिकीकरणाच्या कामाला जवळपास ४ कोटी २५ लाख ३२६ इतक्या निधीच्या अंदाजपत्रकाला मान्यता देण्यात आली होती. यातून ग्रंथालयाचे रुपडे बदलण्यात आले आहे.

या कामासाठी शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या निधीपैकी जवळपास ४ कोटी २१ लाखाहून अधिकचा निधी शासनाच्या मान्यतेने वितरीत करण्यात आला आहे. यातील ३ लाख ९१ हजार रुपये हा उर्वरित निधी वितरीत करण्याबाबत शासनाने मान्यता दिली आहे. 

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:40 PM 01/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow