रत्नागिरी : कोळंबे गावातील जलस्रोतांवर पर्यटकांस बंदी

Jul 2, 2024 - 10:21
Jul 2, 2024 - 10:22
 0
रत्नागिरी : कोळंबे गावातील जलस्रोतांवर पर्यटकांस बंदी

रत्नागिरी : पावसाळ्यात कोकणातील धबधबे, तळी भरभरून वाहत असतात. त्यामुळे या ठिकाणी पावसाळी पर्यटकांची देखील गर्दी होत असते. मात्र अशा ठिकाणी दारू पिऊन हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांमुळे आता हि ठिकाणी बदनाम होऊ लागली आहेत. याचा त्रास आता तेथील ग्रामस्थांना होत असल्याने आता काही गावातून या नैसर्गिक जलस्रोतावर पोहण्यास ग्रामपंचातीकडून बंदी घालण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. 

रत्नागिरी जवळच असणाऱ्या कोळंबे ग्रामपंचायती देखील असे पाऊल उचलले आहे. कोळंबे ग्रामपंचायतीकडून याबाबत एक पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. कोळंबे गावाच्या हद्दीत असणाऱ्या तलाव, तळी, नदी आदी ठिकाणी पोहणे, कचरा टाकणे, धूम्रपान करणे, गैरवर्तन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा या पत्राद्वारे देण्यात आला आहे. खरं  म्हणजे पावसाळ्यात कोकण अधिक बहरतो. तुडुंब वाहणाऱ्या नद्या, नाले, धबधबे यामुळे येथील पावसाळी पर्यटन वाढते. स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी देखील निर्माण होतात. अशा वेळी गावपातळीवर नियोजन करीत पर्यटनास सरसकट बंदी न घालता येथील पर्यटनास शिस्त कशी लागेल याकडे ग्रामपंचायतींनी लक्ष देणे गरजेचे आहे, असा सूर देखील जनमानसातून उमटत असल्याचे दिसत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर


10:29 02-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow