ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Jul 3, 2024 - 11:44
Jul 3, 2024 - 11:48
 0
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी : जिल्हा ठिकाणातील सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विषेश मागास प्रवर्गातील (भटक्या जमाती (क) प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून) उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालकांनी केले आहे.

या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय वर्षाला भोजन भत्ता रु. २५ हजार, निवासी भत्ता रु. १२ हजार व निर्वाह भत्ता रु. ६ हजार असे एकूण रु. ४३ हजार इतकी रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार सलग्न बँक खात्यात वितरित करण्यात येईल. तसेच तालुकास्तरीय वर्षाला भोजन भत्ता रु. २३ हजार, निवासी भत्ता रु. १० हजार व निर्वाह भत्ता रु. ५ हजार असे एकूण रु.३८ हजार इतकी रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार सलग्न बँक खात्यात वितरित करण्यात येईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती या प्रमाणे आहेत.

योजनेची माहिती व अर्ज जिल्ह्यातील सहायक संचालक (इतर मागास बहुजन कल्याण) यांच्याकडे ऑनलाईन / ऑफलाईन अर्ज सादर करतील. सहायक संचालक (इतर मागास बहुजन कल्याण) हे अर्जाची छाननी करतील आणि पात्र लाभार्थ्यांना जवळचे मागासवर्गीय मुला/मुलींचे वसतिगृहाचे गृहपाल यांच्याशी संलग्न करतील.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 PM 03/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow