संगमेश्वर : आंबव पोंक्षे गावात 'लाडकी बहीण योजने'ची जनजागृती

Jul 9, 2024 - 10:08
Jul 9, 2024 - 11:10
 0
संगमेश्वर : आंबव पोंक्षे गावात 'लाडकी बहीण योजने'ची जनजागृती

माखजन : संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे गावात नुकत्याच जाहीर झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जनजागृती करण्यात आली. एकदा निघालेल्या शासन निर्णयानंतर, शुद्धीपत्रक निघाल्याने अनेक लाभार्थी महिलांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. शिवाय कागद पत्रांची जमवाजमव करण्यासाठी सगळ्या शासकीय कार्यालयासमोर रांगा लागल्या होत्या. महिला लाभार्थीच्या शंका, अडचणी दूर करण्यासाठी व जास्तीत जास्त या योजनेचा गावातील महिलांना लाभ मिळण्यासाठी आंबव पोंक्षे ग्रामपंचायतीच्या सभागृहात मेळावा घेऊन जनजागृती करण्यात आली.

या मेळाव्याला शेकडो महिला उपस्थित होत्या. सरपंच शेखर उकार्डे यांनी या योजनेची अंमलबजावणी सुयोग्य व्हावी, या दृष्टिकोनातून उपस्थित महिलांना माहिती दिली. शासनातर्फे मिळालेल्या मुदत वाढीचा उल्लेख करत, घाईगर्दी न करता कागदपत्रांची पूर्तता करूया, असे आवाहन केले. संगमेश्वर तालुक्यात शासकीय योजना प्रभावीपणे राबवण्यात आंबव पोंक्षे ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 AM 09/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow