Ratnagiri : पोलिस भरती; अंतिम यादी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणार जाहीर

Jul 31, 2024 - 11:01
Jul 31, 2024 - 11:03
 0
Ratnagiri : पोलिस भरती; अंतिम यादी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात  होणार जाहीर

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पोलिस दलातील रिक्त असलेल्या १४९ पदासाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत नुकतीच लेखी परिक्षा झाली असून मैदानी चाचणीत पात्र ठरलेल्या एकूण १६१६ उमेदवारांपैकी १५६२ उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली आहे. एकास दहा प्रमाणे उमेदवार लेखी परिक्षेसाठी निश्चित करण्यात आले होते. लेखी परिक्षेचे गुणांकन जाहीर करण्यात आले आहे. आता आक्षेप नोंदविण्याची संधी उमेदवारांना देण्यात आली असून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले. तर चालक व बॅण्डसच्या रिक्त ३० पदासाठी ३१ जुलै रोजी बुधवारी लेखी परिक्षा होणार आहे.

जिल्हा पोलिस दलातील रिक्त पदांसाठी दि. १९ जून पासून पोलिस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. १४९ पदांसाठी ८ हजार ७१३ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. यावेळी प्रथमच आलेल्या प्रत्येक उमेदवाराचे फेसस्कॅनिंग करून त्याला मैदानावर प्रवेश देण्यात आला. दि. १५ जुलैपर्यंत मैदानी चाचणीची प्रक्रिया सुरू होती. त्यानंतर लेखी परीक्षा पार पडली. या परीक्षेला १६१६ उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी १५६२ उमेवारांनी लेखी परीक्षा दिली आहे. त्यांची मेरिट लिस्ट पोलिस दलाच्या नोटीस फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पुढील काही दिवस उमेदवारांना लेखी परिक्षेतील गुणांकनाबाबत काही आक्षेप असतील तर ते नोंदविता येणार आहे. आरक्षणनिहाय अंतिम निवड यादी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध केली जाणार आहे.

पोलिस शिपाई पदासोबतच चालक व बॅण्डसच्या रिक्त ३० पदासाठी ३१ जुलै रोजी बुधवारी लेखी परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी २३० उमेवारांना पाचारण करण्यात आले आहे.

बुधवारी लेखी परीक्षा पार पडल्यानंतर पेपर तपासणीअंती त्यांचीही गुणांकन यादी नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. चालकांची २७ तर बॅवॅण्डसमनची तीन पदे याभरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक मुसळधार पाऊस यावर्षी सुरू होता. या कालावधीत भरतीची प्रक्रिया राबवण्याचे आदेश असल्याने, त्या आदेशांची अंमलबजावणी करत राज्यभरातून आलेल्या उमेदवारांची कोणत्याही प्रकारची गैरसोय किंवा भरती प्रक्रियेत पावसामुळे त्यांच्यावर अन्याय होणार नाही. याची खबरदारी घेण्यात आली होती. तर भरतीसाठी आलेल्या मुले, मुली यांची राहण्याची स्वतंत्र व्यवस्था शहरातील मंगलकार्यालयामध्ये करण्यात आली होती. त्यामुळे भरती प्रक्रियेदरम्यान कोणातीही अडचण निर्माण झाली नसल्याचे पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 AM 31/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow