चिपळूण : गोवळकोट येथील मुख्य पाईपलाईनला गळती

Jul 9, 2024 - 11:05
Jul 9, 2024 - 11:59
 0
चिपळूण : गोवळकोट येथील मुख्य पाईपलाईनला गळती

चिपळूण : गोवळकोट येथील पाणी साठवण टाकीच्या मुख्य पाईपलाईनला गळती लागल्याने शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा अनियमित काळासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती चिपळूण नगर परिषद प्रशासनाकडून मिळाली आहे. 

शहराचे उपनगर गोवळकोट किल्ल्यावर पाणी साठवण टाकी आहे. या टाकीतून शहरातील तीन ते चार उपनगरांना पाणी पुरविले जाते. सद्यस्थितीत ऐन पावसाळ्यात पाणी साठवण टाकीच्या मुख्य पाईपलाईनला अचानक मोठी गळती लागली आहे. ती दुरूस्त करण्यासाठी प्रशासनाला काही दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी गोवळकोट रोड, मुरादपूर, पेठमाप, उक्ताड आदी उपनगर भागातील नागरी वस्तीला पाणीपुरवठा करणे अशक्य होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 09-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow