चिपळूण : नाल्यातलं पाणी थेट रॉयलनगर येथील अपार्टमेंटमध्ये

Jul 10, 2024 - 09:44
Jul 10, 2024 - 09:45
 0
चिपळूण : नाल्यातलं पाणी थेट रॉयलनगर येथील अपार्टमेंटमध्ये

चिपळूण : शहरातील रॉयलनगर येथील अपार्टमेंट परिसरातील नाला फुटल्याने पावसाचे पाणी थेट तळमजल्यात शिरल्याचा प्रकार रविवारी झालेल्या पावसात घडला. मुसळधार पावसात हा प्रकार घडत असल्याने नागरिकांना बाहेर पडणे अवघड बनले आहे.

या अपार्टमेंटच्या तळमजल्यावर सदनिकाधारकांचे वीजमिटर आहेत. चुकून विद्युतवाहिनीला पाणी लागले तर विजेचा धक्का बसण्याची शक्यताही नाकारता येत आहे. काही वर्षांपवीं काही ठराविक लोकांनी आमदार शेखर
निकम यांच्याकडे अर्जही दिला होता; परंतु त्यानंतर पाठपुरावा झाला नाही. रॉयलनगर येथील नाला खूप जुना आहे. नाला फुटल्याने अपार्टमेंटच्या ए विंगमध्ये ढोपराभर पाणी येत आहे तसेच पाणी निघून गेल्यावर चिखल होत आहे. त्या चिखलावरून कोणी पडले तर गंभीर दुखापत होण्याची शक्यता आहे. या परिसरात पाणी साचून राहत असल्याने डासांचा त्रासही वाढला आहे. या संदर्भात काही दिवसांपूर्वी रॉयलनगरमधील महिलांनी नगरपालिका प्रशासनाकडे निवेदनही दिले आहे; मात्र अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 AM 10/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow