'रेमल' च्या प्रभावाने किनारपट्टी भागात पूर्वमोसमी पावसाला अनुकूल वातावरण

May 28, 2024 - 11:51
 0
'रेमल' च्या प्रभावाने किनारपट्टी भागात पूर्वमोसमी पावसाला अनुकूल वातावरण


रत्नागिरी : 'रेमल' चक्रीवादळाच्या प्रभावाने अरबी सागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावाने कोकण किनारपट्टी भागात पूर्वमोसमी पावसाला अनुकूल वातावरण प्राप्त झाल्याने किनारी भागात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

परिणामी या आठवड्यात हवामान ढगाळ राहणार आहे. या कालावधीत वाऱ्याच्या ताशी वेगात वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. 

दरम्यान, सोमवारी जिल्ह्याच्या अनेक भागात हलक्या सरींनी हजेरी लावली. दरम्यान, पुढील दोन दिवस हवेचा दाब १००२ हेष्टापास्कल राहिल. कमाल व किमान तापमानात घसरण होईल. कोकण, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रात वाऱ्याच्या दिशेत बदल होऊन ते नैऋत्येकडून वाहण्यास सुरुवात होईल. त्यामुळे मोसमी पावसाच्या प्रवेशासासाठीही अनुकुलता राहणार असल्याचे हवामान विभागाने जारी केलेल्या संदेशात नमुद करण्यात आले आहे.

कोकण किनारपट्टी भागात सकाळच्या सापेक्ष आर्द्रतेत वाढ होण्यास सुरुवात झाली असून, सोमवारी सकाळी पावसाच्या हलक्या सरींनी रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश भागात हजेरी लावली. त्यामुळे पुढील दोन दिवस सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत प्रतिदिन १ ते २ मि.मी. पावसाची शक्यता आहे. 
वाऱ्याची दिशा प्रामुख्याने रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत नैऋत्येकडून, तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत वायव्येकडून राहिल. वाऱ्याचा ताशी वेग पालघर जिल्ह्यात १९ कि.मी., तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यांत ताशी १२ ते १५ मिमी राहील. सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस राहिल. आकाश सर्वच जिल्ह्यांत अंशत ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यात सकाळची व दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत वाढ होईल. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ८६ टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० ते ६५ टक्के इतकी राहिल. दरम्यान, सोमवारी पहाटे पाचनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील काही भगात हलका पाऊस झाला. रत्नागिरी तालुक्यातील ग्रामीण भागासह शडरातही अलक्या सरींनी हजेरी लावली होती. संगमेश्वर, गुहागर, आणि दोपोली तालुक्याच्या काही भगात पावसाच्या मध्यम स्वरुपाच्या सरींनी हजेरी लावली, दिवसभर वातावरणात मळभाचे अच्छादन कायम होते. ही वातावरणीय स्थिती या आढवड्यात कायम राहणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 28-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow