दापोली : पंचनदी शाळेची संरक्षण भिंत कोसळली

Jul 10, 2024 - 10:11
 0
दापोली : पंचनदी शाळेची संरक्षण भिंत कोसळली

दापोली : दापोलीत पावसाचा जोर वाढत असताना पडझडीच्या घटना घडत आहेत. सोमवारी ८ रोजी पडत असलेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील गुरववाडी वणौशीतर्फे पंचनदी या शाळेची संरक्षण भिंत कोसळली आहे. 

अतिमुसळधार पाऊस पडत असल्याने शासनाने शाळा बंद ठेवल्या होत्या. त्यामुळे अनर्थ टळला. गुरववाडी वणौशीतर्फे पंचनदी ही शाळा पहिली ते सातवीपर्यंत आहे. अजूनही तालुक्यात पावसाचा जोर ओसरला नाही. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २६१ शाळा आहेत त्यापैकी अनेक शाळा इमारती या जुन्या आहेत. त्यामुळे पावसात मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर येत आहे. दापोली गट शिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव हे पावसाच्या परिस्थितीकडे लक्ष ठेऊन आहेत. पावसाळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पालकांनी देखील मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन येथील माजी सरपंच अमित नाचरे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 10-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow