रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाने १५ लाखांचं नुकसान

Jul 10, 2024 - 12:24
Jul 10, 2024 - 12:25
 0
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाने १५ लाखांचं नुकसान

रत्नागिरी : गेले दोन दिवस रत्नागिरीत जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने झोडपल्याने जिल्ह्यात सुमारे १५ लाखांची हानी झाली आहे. मंगळवारी जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झालेल्या गुहागर तालुक्यातील दोन गावातील ३७ पूरग्रस्त लोकांना सुरक्षित जागी स्थलांतरित करावे लागले.

जिल्ह्यात मंगळवारी संपलेल्या २४ तासात गुहागर तालुक्यात सर्वाधिक १४६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गुहागर तालुक्यासह दापोलीसह खेड तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. दापोली तालुक्यात दहागाव येथे राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याची साईडपट्टी खचल्याने वाहतूक बाधीत झाली. काही वेळातच मात्र येथील वाहतूक सुरळीत करण्यात आली. आवाशी येथील सावित्री शांताराम शेडगे यांच्या घराचे अतिवृष्टीमुळे ६८ हजार १०० रुपयांचे, सारंग येथे सुनिता गणू बेढबरी यांच्या घराचे अंदाजे १५ हजार रुपयांचे, शिरखल येथे बाळकृष्ण धानाजी देसाई यांच्या घराचे अंदाजे ८० हजार रुपयांचे, टाळसुरे येथील देविदास गणपत करमकर यांचे न्हाणीधराचे व इतर घराचे २ लाख ७३ हजार रुपयांचे नुकसान झाले. जोरदार पावसात करजाणी ग्रा. पं. च्या मुख्य रस्त्यांचे अंदाजे १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. करजाणी येथील नितीन सुरेश बारदुले यांच्या घरातील सामान वाहून गेल्याने अंदाजे ४० हजार रुपयांचे, राजेंद्र हरिश्चंद्र पालेकर यांच्या अन्नधान्याचे ७ हजार ४०० रुपयांचे तर दापोली तालुक्यातील सारंग येथील जायदा रफिक भारदी यांच्या दुकानात पाणी शिरून अन्नधान्याचे ५ हजार रुपयांचे नुक्सान झाले आहे.

खेड तालुक्यालाही मुसळधार पावसाचा फटका बसला तालुक्यातील मांडवे येथे बाळकृष्ण रेवणे यांच्या घरावर नारळाचे झाड पडून अशंत नुकसान झाले आहे. सावाधिक पाऊस झालेल्या गुहागर शहरातील ३ घरांमध्ये पुराचे पाणी गेल्याने १० लोकांना तसेच घरांमध्ये पाणी जाण्याची शक्यता असल्याने २३ लोकांना अशा एकूण ३३ लोकांना त्यांचे नातेवाईकांकडे स्थलांतरित करण्यात आले. तालुक्यातील आरे गावातील नदीकाठालील २ घरांमध्ये पाणी गेल्याने ४ नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

राजापूर तालुक्यात आंबोळगड येथील गगनगिरी मठावरील पत्रे उडून गेल्याने अंदाजे ५० हजार रुपयांचे, करक पुनर्वसन येथे शुभांगी नरेंद्र गांधी यांचे अतिवृष्टी मुळे घराचे अंशतः अंदाने नुकसान ५५ हजार रुपयांचे, जैतापूर येथे शिल्पा सुभाष मांजरेकर यांचे घराची भिंत पडून अंशत १० हजार रुपयांचे, ताम्हाणेवा येथील संभाजी कानेटकर यांच्या घरावर झाड पडल्याने घराचे अंशतः अंदाने ७ रा हजार रुपयांचे, मोसम येथे पांडुरंग सयाजी कोकरे यांच्या घराची संरक्षित भिंत वि पडल्याने ८ हजार रुपयांचे, केळवली येथील उर्मिला उदय कासार यांचे घरात पावसाचे पाणी शिरल्याने अंदाजे ८ हजार रुपयांचे, कोंडये तर्फे सौंदळ येथील रमेश महादेव शिवगण यांच्या घराचे मुसळधार पावसाने अंदाजे १ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच मधुकर विठोबा शिवगण यांच्या घराचे मुसळधार पावसाने ५० हजारांचे, कशेळी येथील योगांती शिवानी बोरकर यांच्या घराचे पावसामुळे अंशतः १० हजार २० रुपयांचे जवळेथर(कांबळेवाडी) येथील नामदेव तुकाराम कुवळेकर यांच्या घराची संरक्षक भिंत घरानजिक असलेल्या वहाळातील पाण्याच्या प्रवाहामुळे पडल्याने अंदाजे ८ हजार रुपयांचे, जवळेथर येथील धोंडू शिवराम मोरे यांच्या मालकीची विहीर जामदा नदी पात्रातील पाणी पातळी वाढल्याने पाण्याच्या प्रवाहाने कठडे बाहून गेल्याने अंदाजे ५ हजार रुपयांचे नुकसान झाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 PM 10/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow