लांजा : माचाळमध्ये उभारणार नवीन बीएसएनएलचे टॉवर

Aug 2, 2024 - 12:21
Aug 2, 2024 - 15:27
 0
लांजा : माचाळमध्ये उभारणार नवीन बीएसएनएलचे  टॉवर

लांजा  : तालुक्यातील समुद्र सपाटीपासून ४ हजार फूट उंचावर आणि दुर्गम असलेल्या माचाळ या पर्यटन ठिकाणी रिंग वाजणार आहे. माचाळ येथे फोरजी नवे तंत्रज्ञानासह बीएसएनएलचा नवीन टॉवर उभारणीचे काम होणार आहे. तालुक्यात नवीन दहा बीएसएनएल टॉवर मंजूर झाले आहेत. महिनाभरात फोर जी बीएसएनएल नेटवर्कचा लांजावासीयांना फायदा होणार आहे.

लांजा येथील बीएसएनएलच्या अधिकारी आरती जोशी यांनी पत्रकारांना सांगितले, तालुक्यात बीएसएनएल नेटवर्क लवकरच नवीन तंत्रज्ञानासह ग्राहकांना मिळेल. तालुक्यात २० टॉवर असून, आणखी दहा नवीन टॉवरची भर पडत आहे. यामध्ये माचाळ, चिंचुडीं, पाळू, हर्दखळे, वणगुळे, बापरे, गोविल, वाडीलिंबू आदी ठिकाणी नवे बीएसएनएल टॉवर होत आहेत. माचाळ या ठिकाणी बीएसएनएल टॉवरसाठी सर्वे होऊन जागा निश्चिती झाली आहे. चिंबुर्डी माचाळ या अतिदुर्गम भागात आता बीएसएनएल रेंज उपलब्ध होणार आहे. नवीन टॉवर हे शासकीय जागेतच होणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:49 PM 02/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow