अबू आझमी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

Jul 10, 2024 - 14:49
 0
अबू आझमी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणूका पार पडल्यानंतर (Lok Sabha Election 2024) आता साऱ्यांना महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Assembly Election 2024)वेध लागले आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मुसंडी मारली.

तर महायुतीला काही ठिकाणी जबर फटका बसला आहे. अशातच आता महाविकास आघाडी आणि महायुतीकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात झाली आहे. त्याच अनुषंगाने राज्यातील राजकीय पक्षाकडून अनेक आघाड्या आणि काही नेते आपल्याकडे वळण्याचे प्रयत्न सुरू असताना समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी (Abu Azmi) यांच्या बाबत एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. अबू आझमी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांची दिली आहे.

अबू आझमी आणि अजित पवारांमध्ये सुमारे तासभर चर्चा

भाजपचे (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी नुकतंच अबू आझमी यांच्या अनुषंगाने एक ट्विट केलं होतं. त्यानंतर थेट अबू आझमी यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. तसेच या चर्चांना कारण ठरलं होते ते तीन दिवसांपूर्वी अबू आझमी यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची घेतलेली भेट. या भेटीतच राष्ट्रवादी प्रवेशाची तारीख निश्चित झाली, अशी चर्चा सुरु झाली. परंतु त्याच्या दुसऱ्या दिवशी आझमी यांनी या चर्चा चुकीच्या असल्याचं जाहीर केलं होतं.

मात्र हाती आलेल्या विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार अबू आझमी यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती पुढे आली आहे. या दोघांमध्ये सुमारे 1 तास चर्चा झाल्याचीही माहिती समोर आले आहे. अबू आझमी यांच्या समाजवादी पक्षाचे विधानसभेत दोन आमदार आहेत. यात रईस शेख आणि अबू आझमी हे विधानसभेचे सदस्य आहेत. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीचा अनुषंगाने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता

भाजप नेते किरिट सोमय्या यांनी 19 एप्रिलला ईडीच्या प्रमुखांना पत्र लिहित थेट अबू आझमी यांच्या भ्रष्टाचाराचा लेखाजोखा मांडला आणि त्यानंतर अबू आझमी यांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळाले. त्यानंतर अबू आझमी आणि राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीची बातमी समोर आली. ते राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता असल्याच्या चर्चा सुरु झाल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:15 10-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow