नळ पाण्यासाठी काढलेले चर भरा; देवरूखवासीयांची प्रशासनाकडे मागणी

Jul 10, 2024 - 11:07
Jul 10, 2024 - 14:48
 0
नळ पाण्यासाठी काढलेले चर भरा; देवरूखवासीयांची प्रशासनाकडे मागणी

साडवली : देवरूख शहरातील काही भागामध्ये रस्त्याला खड्डे पडले असून, नळ पाणी योजनेसाठी खोदलेल्या चरांचेही खड्डात रूपांतर झाले आहे. त्याकडे नगरपंचायतीने लक्ष पुरवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. नगरपंचायती जवळ लक्ष्मीबाई राजवाडे चौकात पावसाळी डांबराने बुजवलेले खड्डे पुन्हा डोके वर काढत आहेत. या मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गाकडे जाणाऱ्या मार्गावर नळपाणी योजनेसाठी खोदलेले चर पुन्हा रुंदी वाढवून वाहनचालकांना त्रास देत आहेत. भूमिअभिलेख कार्यालयाजवळ दोन मोठे खड्डे आहेत. त्याकडे बांधकाम विभाग व देवरूख नगरपंचायत एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. शहरातील रस्त्यावर दुरुस्तीसाठी खर्च करूनही वारंवार खड्डे होत आहेत. त्यामुळे रस्ते बांधणीतच पाणी मुरले आहे की काय, अशी चर्चा नागरिकांमध्यो सुरू आहे. दुरस्ती केलेल्या रस्त्यांवर नको त्या ठिकाणी गतिरोधक टाकलेले आहेत. त्या ठिकाणी आहेत. पांढरे पट्टेही मारलेले नाहीत, देवरूख-साखरपा-संगमेश्वर मार्गासाठी बांधकाम विभागाकडून निधी खर्च पडूनही रस्त्याची, गटारांची कामे पूर्ण होऊ शकलेली नाहीत. त्यासाठी अनेक संस्था संघटनांनी पाठपुरावा केला तरीही काही फरक पडलेला नाही. या अपुऱ्या कामाकडे देवरूख नगरपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:15 PM 10/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow