रत्नागिरीतील खेळाडूंचे यश : 22 सुवर्ण, 12 रौप्य, 10 कांस्य पदकांची कमाई करत द्वितीय क्रमांक पटकावला

Jul 10, 2024 - 15:09
Jul 10, 2024 - 15:13
 0
रत्नागिरीतील खेळाडूंचे यश : 22 सुवर्ण, 12 रौप्य, 10 कांस्य पदकांची कमाई करत द्वितीय क्रमांक पटकावला

रत्नागिरी : 22 वी सिनियर महिला व पुरुष ज्युनिअर आणि सबज्युनिअर ७ वी कॅडेट व पि वी मुले व मुली रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद क्युरोगी व पुमसे तायक्वांदो चॅम्पियनशिप 2024-25 रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 5 ते 7 जुलै 2024 या कालावधीत डॉ बाबा साहेब आंबेडकर भवन राजापूर येथे तायक्वांदो स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेला 400 खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.  त्यामध्ये रत्नागिरीतील मधील 60 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

पदक विजेत्या खेळाडूंची नावे पुढील प्रमाणे :
सुवर्ण पदक - अथर्व मुरकुटे, पार्थ गुरव, स्वरा साखळकर ( फाईट पुमसे ), वेदांत चव्हाण, सार्थक चव्हाण, मृण्मयी वांयगणकर, ओम अपराज (जुनियर सीनियर) देवण सुपल, अमेय सावंत, वेदागी हलबे, स्वर्णिका रसाळ, गौरी विलणकर, मृदुला पाटील, श्रेयसी हातिसकर, सुरभी पाटील, बरखा संदे, त्रिशा मयेकर (जुनियर सीनियर) सर्मथा बने, प्रसन्ना गावडे 
 
रौप्य पदक - रोहित कुंदकर, अनफाल नाईक, तुषार कोळेकर, अराध्य सावंत, सुजल सोळुंके, रावी वारांग, प्रांजल लांजेकर, अध्या कवीतके, श्रुती चव्हाण  सान्वी मयेकर, दिव्या साळवी, सई सावंत 

कांस्य पदक - आदित्य मोरे, मयुरेश गवळी, साकेत परकर, पार्थ गावडे, आर्वी नार्वेकर, सलोनी सुर्वे  गागीॅ घडशी, ऋतूचा चित्ते

सर्व विजेत्या खेळाडूचे सर्वत्र कौतुक होत आहे. या खेळाडूंना तायक्वांडो प्रशिक्षक शाहरुख शेख मिलिंद भागवत प्रशांत मकवाना, महिला प्रशिक्षक सौ. आराध्या मकवाना यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सर्व पदाधिकारी, पालक वर्ग, खेळाडूच सर्व रत्नागिरी तालुक्यातून अभिनंदन केले जात आहे. विजेते खेळाडूना तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे खजिनदार व्यंकटेशराव कररा, रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, यांनी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेला राष्ट्रीय पंच साहिल आबरेकर  सई सावंत प्रसन्ना गावडे मानली  बेटकर यांनी पंच म्हणून काम केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:38 10-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow