राजापूरात ब्रिटिशकालीन वखारीच्या सुशोभीकरणाला दोन कोटींचा निधी मंजूर

Jul 10, 2024 - 15:34
Jul 10, 2024 - 15:34
 0
राजापूरात  ब्रिटिशकालीन वखारीच्या सुशोभीकरणाला दोन कोटींचा निधी मंजूर

राजापूर : राजापूर शहरातील ऐतिहासिक ठेवा असलेल्या ब्रिटिशकालीन वखारीत लवकरच सुशोभीकरणाच्या मिळणार आहे. त्यासाठी शासनाकडून सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून केल्या जाणाऱ्या कामाचा एमटीडीसीमार्फत प्रारूप आराखडाही तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार लवकरच सुशोभीकरणाच्या कामाची सुरुवात होणार असून त्याद्वारे राजापूरच्या या ऐतिहासिक ठेव्याच्या पुनर्निर्मितीला चालना मिळणार आहे.

दरम्यान, ब्रिटिशकालीन वखारीच्या सुशोभीकरणाचा करण्यात आलेल्या प्रारूप आराखडयाची येथील पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांना नुकताच एमटीडीसीचे उपअभियंता नारकर, आर्किटेक बाप यांनी नुकतीय भेट घेऊन माहिती दिली. त्यानंतर त्यांनी शिवकालीन वखारीची पाहणीदेखील केली. या वेळी त्यांच्या समवेत माय राजापूरचे जगदीश पवार-ठोसर, मोहन पुये, अरविंद लांजेकर, अमित मोंडे आदी उपस्थित होते. 

सिद्दी जौहरने पन्हाळगडाला वेढा घातला त्या वेळी राजापूर फॅक्टरीतील इंग्रज अधिकारी रेव्हिग्टन याने सिद्दी जौहरला लांब पल्ल्याच्या तोफा पुरवल्या होत्या. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अडचणीत वाढ झाली होती. पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुखरूप सुटल्यावर १६६१ मध्ये इंग्रजांना अद्दल घडवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजापुरात येऊन वखार लुटली. त्यातून इंग्रजांच्या झालेल्या बिमोडातून अल्पावधीत ही वखार बंद पडली होती. काळाच्या ओघात पुरातत्त्व विभागाकडून झालेल्या दुर्लक्षतेमुळे ही वखार नामशेष झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून शिवप्रेमींनी ब्रिटिशकालीन वखारीच्या पुनरूज्जीवनाचा प्रश्न हाती घेतला आहे. या ठिकाणी शिवसृष्टी उभारण्याचा शिवप्रेमींचा मानसही आहे. माय राजापूर संस्थेने शिवकालीन वखारीच्या पुनर्निर्माण मार्गदर्शक आराखडा तयार करून त्याच्या मंजुरीचा शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:02 PM 10/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow