चिपळूण रेल्वेस्थानकात प्रवासी शेड उभारण्याची मागणी

Sep 5, 2024 - 14:38
Sep 5, 2024 - 14:39
 0
चिपळूण रेल्वेस्थानकात प्रवासी शेड उभारण्याची मागणी

चिपळूण : कोकणातील मध्यवर्ती असणाऱ्या चिपळूण रेल्वे स्थानकावरील दोन्ही फलाटावर शेड उभारण्यात यावी, अशी मागणी आ. शेखर निकम यांनी कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांच्याकडे केली आहे. या बाबत त्यांनी संबंधितांना निवेदन दिले आहे. चिपळूण रेल्वेस्थानक हे कोकण रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक आहे. या स्थानकावर चोवीस तास प्रवाशांची मोठी गर्दी असते. चिपळूणसह, खेड, संगमेश्वर, गुहागर, कोयना, पाटण या भागातील प्रवासी या स्थानकातून प्रवास करीत असतात. या शिवाय लोटे, गाणे- खडपोली, खेर्डी औद्योगिक वसाहतीमुळे उद्योजक आणि कामगारांसाठी हे मध्यवर्ती स्थानक आहे. या शिवाय चिपळूण हे व्यापारी केंद्र असल्याने या ठिकाणी प्रवाशांची गर्दी होत असते. त्यातून कोकण रेल्वेला मोठा फायदा होतो. को. रे. ला उत्पन्न देणारे हे स्थानक असून मात्र येथील दोन्ही फलाटांवर पूर्णतः शेड नाही. त्यामुळे गैरसोय होते. उन्हाळा व पावसाळ्यात लोकांना ट्रेन पकडण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागते.

रेल्वेचे डबे दोन्ही बाजूकडे असल्याने पावसात भिजत अथवा उन्हातून धावतपळत ट्रेन पकडावी लागते. याचा कोकण रेल्वे प्रशासनाने गांभीयनि विचार करावा आणि दोन्ही फलाटांवर पूर्णतः शेड उभारावी, अशी मागणी आ. निकम यांनी को. रे. च्या व्यवस्थापकीय संचालकांकडे केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:06 PM 05/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow