खेड : कोरेगावातील वैद्यकीय अधिकारी निवासाची दुरवस्था

Jul 11, 2024 - 11:02
Jul 11, 2024 - 11:37
 0
खेड :  कोरेगावातील वैद्यकीय अधिकारी निवासाची दुरवस्था

खेड : तालुक्यातील खाडीपट्ट्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कोरेगाव येथील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निवासस्थानाची दुरवस्था झाली आहे. मुसळधार पाऊस पडताना त्यामध्ये छत्री उघडून बसण्याची वेळ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर आली आहे. या परिस्थितीची दखल प्रशासन घेईल का? असा सवाल नागरिकांतून उपस्थित आहे.

खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील महत्त्वाचे प्राथमिक आरोग्य केंद्र कोरेगाव आहे. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांच्या निवासस्थानावरिल पत्राशेड अत्यंत खराब झालेले आहे. तसेच पत्र्यांना गंज लागून तुकडे पडलेले आहेत व शेडवरील काही पत्रे वाऱ्याने उडून गेले आहेत. सध्या पावसाळा सुरू झाल्याने हे निवासस्थान राहण्यास योग्य नाही. पत्राशेड व स्लॅब लिकेज झाल्यामुळे निवासस्थानातील खोल्यांमध्ये मुसळधार पावसात पाणी साठत आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र कोरेगाव हे अत्यंत दुर्गम भागातील व खाडेपट्टीतील एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. हे आरोग्य केंद्र खेड शहारापासून दहा ते बारा कि.मी. अंतरावर आहे. या केंद्रामध्ये अत्यावश्यक वैद्यकीय सेवा दिल्या जातात. तसेच सर्प व विंचूदंश, प्रसुती, अपघातग्रस्त रुग्ण असे गंभीर रुग्ण कार्यक्षेत्रातील बहिरवली पन्हाळजे या सारख्या ३५ ते ४० किमी अंतरावरुन येतात. या रुग्णांना वैद्यकीय अधिकारी निवासी राहून सेवा देत आहेत. पण या निवास्थानाची पत्राशेड खराब झाल्यामुळे तेथे राहणे कठीण झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 PM 11/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow