कोकणातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेकडे वळावे : विक्रांत जाधव

Jun 27, 2024 - 16:53
 0
कोकणातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेकडे वळावे : विक्रांत जाधव


रामपूर : कोकण बोर्ड स्थापनेपासून सतत निकालात राज्यात अव्वल स्थानी राहिला आहे. आपले विद्यार्थी गुणवंत आहेत. त्यामुळे कोकणातील विद्याथ्यांनी स्पर्धा परीक्षांचा मार्ग धरून प्रशासकीय क्षेत्रात नावलौकिक मिळवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मानी अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी केले. 

चिपळूण तालुक्यातील चिवेली पंचक्रोशी विकास मंडळ संचलित आदर्श विद्यामंदिर, चिवेली या विद्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे माष्णून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेली पंचक्रोशी विकास मंडळाचे अध्यक्ष राजेश सिकें तर विशेष अतिथी म्हणून माजी पंचायत समिती सभापती जितेंद्र चव्हाण उपस्थित होते.

यावेळी विक्रांत जाधव महणाले, कै. गोविंदराव शिर्के यांनी १९७० साली शिक्षणाचे महत्व ओळखून चिवेली पंचक्रोशीतील गोरगरीच मुलांसाठी शिक्षणाची दारे उघडण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे या पंचक्रोशीतील विद्यार्थी शिक्षण घेऊन आज विविध पदावर कार्यरत आहेत. याप्रसंगी विक्रांत जाधव यांच्याहस्ते माध्यमिक शालान्त परीक्षेत अनुक्रमे पाच क्रमांक प्राप्त प्रिती साळवी, पल्लवी शिर्के, प्रथमेश जाडे, वेदांत वाडकर, रिया शिर्के यांचा स्कूल बंग व प्रेरणादायी पुस्तके गौरव करण्यात आला

कार्यक्रमास शाखा समिती अध्यक्ष सुभाष शिर्के, माजी पं. स. सदस्य प्रकाश साजवी, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष अजित साळवी, प्रभाकर जाधव, बामणोली सरपंच सुदेश गमरे, स्कूल कमिटी व्हा. चेअरमन संतोष कुळे, मुख्याध्यापक संजय चव्हाण, ग्रा.पं. सदस्या प्राजक्ता दणदणे यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन नितीन गुरव यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:22 27-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow