त्यांच्याकडे सत्ता, पैसा आहे पण लोकमत आमच्या बाजूनं : संजय राऊत

Jul 12, 2024 - 11:15
 0
त्यांच्याकडे सत्ता, पैसा आहे पण लोकमत आमच्या बाजूनं : संजय राऊत

मुंबई : महाराष्ट्राची सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आणि लोकसभेचे निकाल (Loksabha Result) पाहता अनेक आमदार हे महाविकास आघाडीच्या बाजूने झुकले आहेत, असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं.

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी (Legislative Council elections) 23 मतांचा कोठा आहे. मला पूर्ण खात्री आहे की, सध्याच्या परिस्थितीत पाहता महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून येतील असे राऊत म्हणाले. काँग्रेसची मतं फुटू शकतात मग भाजप, शिंदे गट,अजित पवार गट यांची मत फुटू शकतील असं आपण का समजू शकत नाही. ते काय आकाशातून पडले आहेत का? असा सवाल राऊतांनी केला. त्यांच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे पण लोकमत आमच्या बाजूनं असल्याचे राऊत म्हणाले.

महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील

विधानपरिषदेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडूण आणण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे, शरद पवार, जयंत पाटील आणि त्यांचे सहकारी त्यासाठी यशस्वीपणे प्रयत्न करत असल्याचे राऊत म्हणाले. भाजपलासुद्धा त्यांचे सर्व उमेदवार निवडून आणण्यात इतकी मतं नाहीत. अजित पवार गट, शिंदे गटाकडे इतकी सुद्धा मतं नाहीत. महाविकास आघाडीने तीन उमेदवार उभे केले, काँग्रेसकडे त्यांचा उमेदवार निवडून आणण्यात इतकी मत नक्कीच असल्याचे संजय राऊत म्हणाले. शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील आणि शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर हे उमेदवार आहेत. हे दोन्ही उमेदवार निवडून येतील असेही राऊत म्हणाले. काँग्रेसची मत फुटू शकतात मग भाजप, शिंदे गट,अजित पवार गट यांची मत फुटू शकतील असं आपण का समजू शकत नाही. ते काय आकाशातून पडले आहेत का? असा सवाल राऊतांनी केला. त्यांच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे पण लोकमत आमच्या बाजूने आहे ते लोकसभेत दिसले आहे. त्यामुळं त्यांचेही आमदार फुटू शकतात ना, फुटू शकण्यापेक्षा ते एक वेगळी भूमिका घेऊ शकतात असं राऊत म्हणाले. काँग्रेसचीच मत फुटणार,अन्य कोणाची मत फुटणार नाहीत या भ्रमात आता कोणी राहू नये असेही राऊत म्हणाले.

सत्तेचा गैरवापर होतोय

गणपत गायकवाड जेलमधून येऊ शकतात. पण अनिल देशमुख नवाब मलिक तुरुंगात होते त्यांना मतदानासाठी तुरुंगातून कोणी येऊ दिलं नाही. पण गणपत गायकवाड येऊ शकतात. यालाच म्हणतात सत्तेचा वापर किंवा गैरवापर असेही राऊत म्हणाले. नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानमंत्री आहेत. त्यांना कोणी थांबवलेलं नाही कुठे जाण्यापासून. त्यांनी मुंबईत यावं मुंबईच्या विकासाचा विचार करावा. त्यांनी गोरेगाव मुलुंड लिंक रोडचं भूमिपूजन करावं. पण त्याआधी त्याचं एकदा भूमिपूजन झालेलं आहे. त्यांना अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा करुन त्यांच्याकडून माहिती घ्यावी असं राऊत म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या गुजरातमध्ये रोजगार देऊ शकले नाहीत

गुजरातमध्ये 40 जागांसाठी हजारो तरुण रांगेत उभे आहेत. ही खासगी नोकरी आहे. त्यासाठी चेंगराचींगरी पळापळ हे गुजरात मॉडेल आहे. मोदींनी बेरोजगारांच्या बाबतीत जो खेळ केलेला आहे त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. मोदी आपल्या गुजरातमध्ये रोजगार देऊ शकले नाहीत, मुंबईमहाराष्ट्रातले असंख्य उद्योग पळवून सुद्धा मोदी आपल्या गुजरातच्या लोकांना रोजगार देऊ शकलेले नाहीत, ही धडपड आणि चेंगराचेंगरी पाहिल्यावर मोदींचा हे गुजरात मॉडेल देशाला विनाशाकडे नेणार असल्याचे राऊत म्हणाले. नरेंद्र मोदी परराष्ट्रात जातात आणि हिंदुस्थानामध्ये कसा विकास केलेला आहे त्याची प्रवचन झोडतात. तिथल्या राष्ट्राध्यक्षांनी कालचा गुजरातचा व्हिडिओ पाहायला हवा असेही राऊत म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 12-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow