संगमेश्वर : विद्युत रोहित्र उंच ठिकाणी बसवा; ग्रामस्थांची मागणी

Jul 13, 2024 - 10:18
Jul 13, 2024 - 10:20
 0
संगमेश्वर :  विद्युत रोहित्र उंच ठिकाणी बसवा; ग्रामस्थांची मागणी

संगमेश्वर : अतिवृष्टीमुळे शास्त्री आणि सोनवी नदीचे पाणी झपाट्याने वाढत जाते. रामपेठ, बाजारपेठला विजेचा पुरवठा करणारा ट्रान्सफॉर्मर नदीकिनारी आहे. विद्युत रोहित्र पुराच्या पाण्यात बुडत असल्यामुळे वीज पुरवठा खंडित करावा लागतो. ही परीस्थिती ७ जुलैला निर्माण झाली होती. त्यामुळे ग्राहकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन विद्युत रोहित्र तिथून अन्यत्र स्थलांतरित करावे, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

संगमेश्वर परिसरामध्ये ७ जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे शास्त्री आणि सोनवी नदीचे पाणी झपाट्याने वाढत होते. या परिसरातील रामपेठ, आठवडा बाजारात पुराचे पाणी भरले. रात्री सोनवी नदीचे पाणी बाजारपेठेत येण्याच्या तयारीत होते. पाणी झपाट्याने वाढताना दिसत होते.

अचानक पाणी जेव्हा रात्री अपरात्री भरते, तेव्हा लोकांची खूपच तारांबळ उडते. रात्री लोकांना घरातील आणि व्यापाऱ्यांना दुकानातील सामान सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी विजेची अत्यंत गरज असते; पण रामपेठ, बाजारपेठला विजेचा पुरवठा करणारा ट्रान्सफॉर्मर नदीकिनारी म्हणजे गद्रे यांच्या वखारीसमोर बसवलेला आहे. हे विद्युत रोहित्र कमी उंचीवर बसवल्यामुळे पाणी भरते. त्या वेळी सर्व प्रथम तो पाण्यात जातो. मग नाईलाजाने महावितरणच्या ऑफिसमधून रामपेठ बाजारपेठेची विजपुरवठा बंद करावा लागतो. अत्यंत गरजेचे असताना वीज घालवल्याने लोकांची मोठी गैरसोय होते. ट्रान्सफॉर्मर ज्या वेळी बसवण्यात येतात, त्या वेळी त्या ठिकाणचा थोडा अभ्यास करून बसवणे गरजेचे आहे. संगमेश्वरला ८३ ला महापूर आला होता. त्या वेळेची पाण्याची पातळीची माहीतगार लोकांकडून घेऊन तरी ट्रान्सफॉर्मर हे उंच ठिकाणी बसवले पाहिजेत, अशी ग्रामस्थांची मागणी आहे जेणेकरून पूरपरिस्थितीमध्ये नागरिक व व्यापाऱ्यांची गैरसोय होणार नाही. संगमेश्वर बाजारपेठेतील या त्रूटी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि बाजारपेठेमधील व्यापारी व परिसरातील नागरिक यांनी गांभीयनि लक्षात घेतल्या पाहिजेत, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 AM 13/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow