रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिटडाउनतर्फे रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर एनर्जीसाठी होणार जनजागृती

Jul 13, 2024 - 10:23
 0
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिटडाउनतर्फे रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर एनर्जीसाठी होणार जनजागृती

रत्नागिरी : महाराष्ट्रात सर्वाधिक पर्जन्यमान पडणाऱ्या जिल्ह्यापैकी एक असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात उन्हाळा सुरू होताच पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य जाणवायला लागले आहे. त्यासाठी सामाजिक उपक्रमांत सक्रिय असलेल्या रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिटडाउनतर्फे ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सोलर एनर्जी’ यासाठी जनजागृतीचे महत्वपूर्ण पाउल उचलले आहे. त्यासाठी लवकरच जनजागृतीसाठी शहर आणि ग्रामपंचायतस्तरावर शिबीर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष हिराकांत साळवी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

जागतिक स्तरावर कार्य करणाऱ्या रोटरी इंटरनॅशनल सदस्य असणाऱ्या रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउनचे पदाधिकाऱ्यांचे आगामी मिशन, व्हिजन आणि आगामी वर्षातील पकल्प यीं माहिती शुक्रवारी विषद केली. त्यावेळी या क्लबो अध्यक्ष साळवी यांयासह पदाधिकारी रोटे बिपीनचंद्र गांधी, डॉ. संदीप करे, समीर इंदुलकर, राजेंद्र कदम, डॉ. वैभव कानडे यांची प्रमुख उपस्थिती होती. साळवी यांनी सांगितले की समाजात सकारात्मक बदल घडविण्याया कार्यात रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउनतर्फे मागील 18 वर्षात माजी अध्यक्ष आणि माजी पदाधिकारी तसा सर्व सदस्यांनी रोटरीमार्फत 500 हून अधिक सेवा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केले आहेत.

आता देखील सन 2024-25 सालासाठी डिस्ट्रीक्ट 3170 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शरद पै यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्याचे पाउल उचलण्यात आले आहे. या नियोजनाचा एक भाग येत्या 20 जुलै रोजी रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सोलर एनर्जी या विषयावर रत्नागिरीतील माळनाका शिर्के प्रशाला रंजन मंदिर येथे सेमिनार आयोजित करण्यात येणार आहे. हे केवळ व्याख्यान नसून उर्जाक्षेत्राबाबत समाजात सकारात्मक जाणीव निर्माण करण्यासाठी एक महत्वाचे पाउल आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पर्जन्यमान होते. पण उन्हाळय़ात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवायला लागते. त्यावर मात करण्यासाठी पडणाऱ्या पावसाचे पाणी अडवणे, साठवणे आणि जिरवणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग सेमिनार होणार आहे.

त्याबरोबर अपारंपारिक उर्जा स्त्रोताचा वापर करून उर्जा संपन्न आणि उर्जा स्वावलंबी होण्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत, शासकीय सबसिडी कशी मिळवावी, सारख्या अनेक प्रश्नांवर सखोल मागदर्शन करण्यात येणार आहे. हे सेमिनार सर्वांसाठी मोफत असून गावो सरपां, सदस्य, रहिवासी सोसायट्यांचे अध्यक्ष व सचिव, सर्व व्यवसायिक, कारखानदार, शिक्षक, बिल्डींग कॉन्ट्रक्टर, इलेक्ट्रीक कन्सल्टंट, आर्किटेक्ट, सिव्हिल इंजिनियर आणि इतर इच्छुक रहिवासी यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष हिराकांत साळवी यांनी केले आहे.

त्याबरोबर एमपीएससी, युपीएससीच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांसाठी मार्गंदर्शन शिबीर घेण्या मानस साळवी यांनी व्यक्त केला आहे. मागील दोन वर्षांपासून मेडिकल इक्विपमेंट बँक हा कायमस्वरूपी सर्व्हिस प्रोजेक्ट क्लबने सा केला आहे. त्याअंतर्गंत पेशंट बेड, वॉकर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, व्हीलचेअर अशा आवश्यक वस्तू नाममात्र भाडेतत्वावर उपलब्ध करून दिल्या जातात. या शेकडों गरजूंनी लाभ घेतला आहे. समाजातील दानशूर व्यक्तींकडून या इक्विपमेंटसाठी वस्तू स्वरूपात देखील देणगी स्वीकारली जात आहे. तसा दरवर्षी मोफत गणवेश वाटप, शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, गणेशोत्सव निर्माल्य संकलन, बॅटमिंटन स्पर्धा, निबंध स्पर्धा, विविध वैद्यकीय आजारांवर मार्गदर्शन व मोफत तपासणी शिबीरे, विविध तज्ञांची मार्गदर्शन व्याखाने, सांस्कृतिक कार्यक्रम केले जात आहेत. या सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा तसा सामाजिक कार्यांसाठी सहकार्याचा हात पुढे करावा असे आवाहनही बिपीनचंद्र गांधी, डॉ. वैभव कानडे, सेक्रेटरी डॉ. संदीप करे, राजेंद्र कदम यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 13-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow