रत्नागिरी : पत्रकारिता आणि मानवी हक्क अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू

Jul 13, 2024 - 16:15
 0
रत्नागिरी : पत्रकारिता आणि मानवी हक्क अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू

रत्नागिरी : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पत्रकारिता पदविका (Diploma in Journalism) आणि मानवी हक्क (Human Right) शिक्षणक्रम या अभ्याक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला १ जुलै २०२४ पासून सुरवात झाली आहे.

प्रवेश ऑनलाइन पद्धतीने विद्यापीठाच्या https://ycmou.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर सुरू आहेत. रत्नागिरीत या दोन्ही अभ्यासक्रमांचे अभ्यास केंद्र आहे.

पत्रकारिता क्षेत्रात उपयुक्त असणारा पत्रकारिता पदविका आणि सामाजिक क्षेत्रात उपयुक्त मानवी हक्क शिक्षणक्रम या दोन्ही अभ्यासक्रमांचे प्रवेश रत्नागिरीतील विद्यापीठाचे अधिकृत अभ्यासकेंद्र रत्नभूमी जर्नालिझम इन्स्टिटयूट येथे सुरू आहेत. पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमाला बारावी उत्तीर्ण किंवा समकक्ष कोणताही शासनमान्य कोर्स तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा पूर्वतयारी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्यांना प्रवेश मिळेल. मानवी हक्क शिक्षणक्रमासाठी दहावी उत्तीर्ण किंवा समकक्ष कोणताही शासनमान्य कोर्स तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा पूर्वतयारी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्यांना प्रवेश मिळेल. बी.एड करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे दोन्ही कोर्स केल्यानंतर ७ गुणांचे भारांक मिळणार आहेत.

या अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी रत्नभूमी जर्नालिजम इन्स्टिटयूट, ३/२०८, रत्नभूमी बिल्डिंग, पत्रकार कॉलनी, रेल्वे स्टेशनसमोर, कुवारबाव, रत्नागिरी येथे तसेच ९७६३०४७७८७, ९६०७८०९३४३, ९९२१८७९६६० या क्रमांकांवर संपर्क साधावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:41 13-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow