रत्नागिरी : नवीन भाजीमार्केट सुनावणी एक आठवड्याने पुढे गेली

Jul 15, 2024 - 12:49
 0
रत्नागिरी : नवीन भाजीमार्केट सुनावणी एक आठवड्याने पुढे गेली

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील नवीन भाजी मार्केट इमारतीतील व्यावसायिक गाळे रत्नागिरी न.प.च्या ताब्यात देण्यासंदर्भातील न्यायालयातील सुनावणीची तारीख एक आठवड्याने पुढे गेली आहे. शुक्रवारच्या सुनावणीच्यावेळी पुढील सुनावणी १८ जुलै रोजी ठेवण्यात आली होती. न्यायालयाने ही तारीख बदलून ती आता २५ जुलै केली आहे. रत्नागिरी नगर परिषदेच्या मालकीची नवीन भाजीमार्केटची इमारत १९७५ साली बांधली गेली. सन २०१७ मध्ये ही इमारत धोकादायक असल्याचा अहवाल स्ट्रक्चरल ऑडीटमधून मिळालानंतर त्यावेळी रत्नागिरी नगर परिषदेने मार्केटमधील गाळे ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु केली. त्यानुसार गाळेधारकांना नोटीस बजावण्यात आल्या. गाळे ताब्यात घेण्याची प्रक्रिया होवू नये, यासाठी गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतली. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असले तरी कोणतीही स्थगिती दिलेली नाही.

नवीन भाजी मार्केट इमारती इतकी धोकादायक झाली आहे की, स्लॅबचे छोटे-मोठे भाग अधुनमधून पडू लागले. पावसाळ्यात ही इमारत आणखी धोकादायक होणार, या पार्श्वभूमीवर पुन्हा रत्नागिरी नगर परिषदेने गाळेधारकांना नोटीस देवून गाळे ताब्यात देण्यास सांगितले. पुन्हा या नोटीसला स्थगिती मागण्यासाठी गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर नगर परिषदेने अशा सर्वच धोकादायक इमारतींवर नोटीस फलक लावून इमारत पडून कोणतीही हानी झाल्यास रत्नागिरी नगर परिषद जबाबदार राहणार नाही, असे नमूद करण्यात आले. तरीही गाळेधारकांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर दोन दिवसांपूर्वी नगर परिषदेचे एक पथक मार्केट इमारतीत येवून डळमळीत झालेले तेथील लाकडी सामान काढण्यास सुरुवात केली. गाळे तोडून ताब्यात घेण्यासाठीच हे पथक आले असल्याचा समज झाल्याने सर्व गाळेधारक जमा झाले आणि नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांसोबत शाब्दीक बाचाबाची झाली. यावेळी दुसऱ्या नोटीस संदर्भात गेल्या शुक्रवारी न्यायालयात सुनावणी होणार असून यावेळी स्थगिती न मिळाल्यास मंगळवारपर्यंत गाळे रिकामे करून दिले जातील, असा शब्द गाळेधारकांनी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिला.

शुक्रवारी न्यायालयात दुसऱ्या नोटीसविरुद्धची सुनावणी झाली. यावेळी न.प.चे वकील अॅड. नीलांजन नाचणकर यांनी पहिला मुळ दावा आणि दुसरा नोटीसची सुनावणी एकत्रीत घ्यावी, अशी न्यायालयाला विनंती केली, न्यायालयाने ही विनंती मान्य करून १८ जुलै रोजी अंति युक्तीवाद झाल्यानंतर निकाल होण्याचे संकेत मिळाले,

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:17 15-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow