रत्नागिरी : अभियांत्रिकी महाविद्यालयाला लोकनेते शामराव पेजे यांचे नाव
रत्नागिरी : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला केंद्र व राज्य शासनाकडून लोकनेते शामरावजी पेजे नाव देण्यास मंजुरी मिळाली आहे. यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी विशेष प्रयत्न केले होते. २१ ऑगस्टला या महाविद्यालयाचे उद्घाटन असून, त्या वेळी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कुणबी समाजोन्नती संघ मुंबई यांनी केले आहे.
लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा २१ ऑगस्टला सकाळी ११ वा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 21-08-2024
What's Your Reaction?