मुख्यमंत्री माझी शाळा अभियानांतर्गत सर्वंकष विद्यामंदिर रत्नागिरीत प्रथम

Jul 17, 2024 - 14:32
 0
मुख्यमंत्री माझी शाळा अभियानांतर्गत सर्वंकष विद्यामंदिर रत्नागिरीत प्रथम

रत्नागिरी : शाळांच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाकडून राबवण्यात येत असलेल्या 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियानाचा निकाल जाहीर झाला आहे. या अभियानांतर्गत खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळा स्तरावर रत्नागिरीत सर्वंकष विद्यामंदिरने प्रथम क्रमांक प्राप्त केला. या शाळेला तीन लाखाचे पारितोषिक मिळाले आहे.

'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियानांतर्गत शाळेच्या सर्वांगीण प्रगतीचे मूल्यमापन केंद्रस्तरीय, तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय पातळीवर तीन वेगवेगळ्या टप्प्यात करण्यात आले. तपासणी पथकांनी वेळोवेळी शाळेला भेटी देऊन अभियानाच्या स्पर्धात्मक निकषानुसार शाळेतील विविध उपक्रम, कार्यालयीन दप्तर, भौतिक सुविधा यांची तपासणी केली. शाळेच्या कामगिरीबद्दल त्यांनी कौतुक केले.

शाळेला मिळालेला हा मान विद्यार्थीकेंद्री उत्तम पद्धतीने काम करण्याची प्रेरणा देणारा ठरणारा आहे. शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व शाळांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. शाळेच्या प्रगतीसाठी शाळेचे संस्थापक दीपक गद्रे, अर्जुन गद्रे, यांचे मार्गदर्शन लाभत असून, मुख्याध्यापिका मोनिका जयस्वाल, शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष योगदान लाभले आहे. या यशाबद्दल सर्वांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:01 PM 17/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow