गुंतवणूक : २०२४ आणि नंतर विषयावर रत्नागिरीत बुधवारी व्याख्यान

Aug 17, 2024 - 16:35
 0
गुंतवणूक : २०२४ आणि नंतर विषयावर रत्नागिरीत बुधवारी व्याख्यान

रत्नागिरी : गुंतवणूक : २०२४ आणि नंतर या विषयावर रत्नागिरीत बुधवारी (दि. २१ ऑगस्ट) रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयातर्फे चंद्रशेखर टिळक यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

गुंतवणूक हा सर्वांचाच जिव्हाळ्याचा आणि तितकाच गरजेचा विषय असतो. योग्य वेळी योग्य ठिकाणी केलेली गुंतवणूक नेहमीच फायदेशीर असते. हे लक्षात घेऊन वाचनालयाने गुंतवणूक कोठे आणि कशी याबाबत मार्गदर्शन करणारे डॉ. टिळक यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.

गेली २५ वर्षे सातत्याने अर्थसंकल्पीय विश्लेषणाचे कार्यक्रम करणारे, अर्थकारण व गुंतवणूक या विषयाशी संबंधित सुमारे तीन हजार व्याख्याने देणारे तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ज्ञ, व्याख्यानकार, लेखक आणि कवी तसेच टिळक चरित्राचे अभ्यासक अशी डॉ. टिळक यांची ओळख आहे.

त्यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानाला सजग व सुजाण नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, उपाध्यक्ष संतोष प्रभू, कार्यवाह आनंद पाटणकर आणि मालती खवळे यांनी केले आहे. व्याख्यान रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या सभागृहात बुधवारी सायंकाळी ६ वाजता होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:03 17-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow