लांजात मोहरम ताजिया मिरवणूक उत्साहात

Jul 19, 2024 - 10:15
Jul 19, 2024 - 11:24
 0
लांजात मोहरम ताजिया मिरवणूक उत्साहात

लांजा : राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेला मोहरम ताजिया धार्मिक पद्धतीने लांजात उत्साही वातावरणामध्ये पार पडला. मुस्लिम बांधवांच्या पवित्र मोहरम उत्सवानिमित्त शहरातून ढोल-ताशांच्या गजरात ताजियाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. शहरात हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा लाभलेल्या या मिरवणुकीत दरवर्षीप्रमाणे शहरातील प्रमुख मानकरी इतर हिंदू बांधवही सहभागी झाले होते.

 मागील दहा दिवसांपासून सुरु असलेल्या या उत्सवात अंतिम टप्प्यातील मिरवणुकीत शहरातील मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. या मिरवणुकीचा शहरातील हजरत सय्यद चाँदशहा बुखारी दर्गाहमधून दुपारी चार वाजता प्रारंभ झाला. बाजारपेठेतील जुना बस स्टॉप, हनुमान मंदिर, जुनी बाजारपेठ वसाहत, पौलसतेश्वर मंदिर येथील तळ्या जवळून चव्हाटा मंदिर, जामा मशीद या मार्गावरून पुन्हा दर्गाहमध्ये संध्याकाळी सात वाजता ताजिया मिरवणुकीची सांगता झाली. गेले सहा दिवस मुसळधार पडणाऱ्या पावसाने बुधवारी दुपारनंतर उसंत घेतल्याने ताजिया मिरवणूक उत्साहात पार पडली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून लांजा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 AM 19/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow