चिपळूणचे गायक राजाभाऊ शेंबेकर यांना बालगंधर्व रंगसेवा पुरस्कार प्रदान

Jul 20, 2024 - 11:22
 0
चिपळूणचे गायक राजाभाऊ शेंबेकर यांना बालगंधर्व रंगसेवा पुरस्कार प्रदान

त्नागिरी : चिपळूण येथील सुप्रसिद्ध गायक राजाभाऊ शेंबेकर यांना पुण्यात बालगंधर्व रंगसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्राचे नाट्यदैवत बालगंधर्व यांची ५७ वी पुण्यतिथी १५ जुलै रोजी होती.

बालगंधर्व यांच्या निधनानंतर त्यांचे जावई भास्करराव वाबळे यांनी पुण्यात बालगंधर्व संगीत रसिक मंडळ ही संस्था सुरू केली. ता संस्थेमार्फत संगीत नाट्य विभागात भरीव काम करणाऱ्या व्यक्तीला पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी पुरस्कारांचे हे सत्तेचाळिसावे वर्ष आहे. यंदा चिपळूण येथील राजाभाऊ शेंबेकर यांना बालगंधर्व रंगसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. निवृत्त सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या हस्ते श्री. शेंबेकर यांना गौरविण्यात आले.

यावेळी माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, कृष्णकुमार गोयल, विजयकांत कुलकर्णी आणि श्रीधर प्रभू हे मान्यवर उपस्थित होते. बालगंधर्व रंगमंदिरात रंगलेल्या या सोहळ्यात नामवंत गायिका लता शिलेदार, सुप्रसिद्ध गायक महेश काळे, सुकृत ताम्हणकर, महादेव हरमलकर, शिवानंद दाभोळकर, निनाद जाधव, केदार कुलकर्णी, सुधीर ठाकूर, अभय जबडे, सौ. धनश्री गाडगीळ, सौ. माधुरी आंबेकर आणि कु. तन्वी गोरे यांचाही सन्मान करण्यात आला.

बालगंधर्वांनी मराठी रसिकांना कसे घडवले ते श्री. लळीत यांनी आपल्या आजीच्या उदाहरणासह स्पष्ट केले. संस्थेचे अध्यक्ष सुरेश साखळकर यांनी बालगंधर्वांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. राजाभाऊ शेंबेकर यांनी मम आत्मा गमला हे नाट्यपद सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळवली. आपण हा पुरस्कार बालगंधर्व यांचा प्रसाद म्हणून ग्रहण करतो, असे सांगून राजाभाऊंनी आपल्या सर्व गायनगुरूंचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 20-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow