गुहागर : पाचेरी सडा येथे डोंगर खचला

Jul 15, 2024 - 11:54
 0
गुहागर : पाचेरी सडा येथे डोंगर खचला

गुहागर : तालुक्यातील पाचेरीसडा बौद्धवाडी येथे डोंगर खचल्याची घटना घडली आहे. दरड रस्त्यावर आली असून, रस्त्यालगत असणाऱ्या ११ घरांना प्रशासनाकडून स्थलांतराच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. अकरापैकी तीन कुटुंबांना विहारामध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. उर्वरित नऊ कुटुंबे हे मुंबईस्थित आहेत. दरम्यान, घटनास्थळी गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील, बांधकाम विभागाचे अधिकारी, तसेच पाणी विभागाचे अधिकारी यांनी भेट देऊन रस्त्यावर आलेली माती जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करून रस्ता मोकळा करण्याच्या सूचना दिल्या. गुहागरचे तहसीलदार श्री. पाटील यांनी भूगर्भतज्ज्ञांना या घटनेची पाहणी करण्याचे पत्र दिले होते. येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी गुहागर पं. स. कडून एक पाण्याची टाकी तत्काळ उपलब्ध करून देऊन देण्यात आली आहे. दरम्यान, पावसाचा जोर वाढत असल्याने ग्रामस्थांतून भीती व्यक्त होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 PM 15/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow