रत्नागिरीत श्रावण कीर्तन सप्ताहाचे ५ ते ११ ऑगस्टदरम्यान आयोजन

Jul 22, 2024 - 11:23
Jul 22, 2024 - 17:27
 0
रत्नागिरीत श्रावण कीर्तन सप्ताहाचे ५ ते ११ ऑगस्टदरम्यान आयोजन

रत्नागिरी : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी त्रैलोक्यबुवा जोशी सहाय्यक मंडळातर्फे श्रावण कीर्तन सप्ताहाचे आयोजन केले आहे. सप्ताहाचे हे १३ वे वर्ष आहे. ५ ते ११ ऑगस्ट या कालावधीत हा महोत्सव मंडळाच्या भगवान परशुराम सभागृहात दररोज सायंकाळी ५ ते• या वेळेत होणार आहे. सप्ताहात ५ ऑगस्टला गोव्याचे हभप त्रैलोक्यबुवा जोशी हे शिवतत्व (शिवभोळा चक्रवर्ती) धनेश्वर आख्यानावर कीर्तन करणार आहेत. 

६ ऑगस्टला राष्ट्रीय कीर्तनकार पुण्यातील संदीप मांडकेबुवा हे फिरंगोजी नरसाळा आख्यान करतील. ७ ऑगस्टला राजापूरच्या नवोदित व युवा कीर्तनकार जान्ह‌वी परांजपे या संत तुलसीदास या आख्यान विषयावर कीर्तन करतील. ८ ला हेदवी, गुहागर येथील हॉ. श्रीपाद जोगळेकर हे सुधन्वाला श्रीकृष्ण दर्शन यावर कीर्तन सादर करणार आहेत. सप्ताहात १ ता कोळंबे येथील सायली मुळ्ये-दामते या संत वेण्णास्वामी यांच्यावर कीर्तन सादर करतील. १० ला पुण्याच्या डॉ. अवंतिका टोळे या संत रोहिदास आख्यान विषयावर कीर्तन करतील, साप्ताहातील अखेरचे कीर्तन रविवारी १९ ऑगस्टला असून माजलगाव, बीड येथील युवा कीर्तनकार लक्ष्मीप्रसाद कुलकर्णी (पटवारी) हे स्वामी विवेकानंद आख्यान विषयावर निरुपण करतील.

या सप्ताहात ऑर्गनसाथ श्रीरंग जोगळेकर, विजय रानडे, श्रीधर पाटणकर, संतोष आठवते, निरंजन गोडबोले, बाळ दाते, चैतन्य पटवर्धन आणि तबलासाथ प्रथमेश शहाणे, कैलास दामले, पुष्कर सरपोतदार, स्वरूप नेने, वरद जोशी (कुर्धे), निखिल रानडे यांची लाभणार आहे. या कीर्तनसप्ताहातील एखाद्या कीर्तनास मदत करून सेवा रुजू करायची असल्यास मंडळाशी संपर्क साधावा, हा कीर्तनसप्ताह विनामूल्य असून, जास्तीतजास्त कीर्तनप्रेमींनी या कीर्तन सप्ताहाला उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:49 PM 22/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow