चिपळुण : पाग पावर हाऊस परिसरातील अतिक्रमण हटविणार

Jul 8, 2024 - 11:38
Jul 8, 2024 - 14:41
 0
चिपळुण : पाग पावर हाऊस परिसरातील अतिक्रमण हटविणार

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण शहरातील पाग पॉवर हाऊस परिसरात उभ्या असलेल्या अनधिकृत टपऱ्या, हातगाड्यांसह विक्रेत्यांनी उभारलेल्या तात्पुरत्या शेड लवकरच हटविण्यात येणार आहेत. ही अतिक्रमणे काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग कार्यालयाने ठोस पावले उचलली आहेत. याच पार्श्वभूमीवर संबंधित विक्रेते, व्यावसायिकांना नोटीस बजावत चार दिवसांची 'डेडलाईन' देण्यात आली आहे. या दरम्यान तेथील अतिक्रमणे विक्रत्यांकडून स्वतःहून काढण्यात आली नाहीं, तर कारवाई केली जाणार आहे.

शहरात बहादूरशेख नाका ते पाग नाक्यादरम्यान महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. पाग पॉवर हाऊस या ठिकाणी मोठा चौक असल्याने आणि येथे वाहतुकीचे नियमन अद्याप तरी व्यवस्थित न झाल्याने वारंवार अपघात घडत आहेत. येथे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. या परिसरात महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्णत्वास जाताच महामार्गाल गत महावितरण कंपनीच्या बाजूने चक्क गटारांवर अनेकांनी आपले व्यवसाय थाटले आहेत. काहींनी तर शेड उभारल्या आहेत.

या सर्व शेड व येथील टपऱ्या, हातगाड्या अनधिकृतरित्या उभ्या करण्यात आल्या असल्याची सातत्याने ओरड होत आहे. याची गंभीर दखल घेऊन राष्ट्रीय महामार्ग उपविभागाने येथील सर्वच विक्रेते, टपरीधारकांना नोटीस काढली आहे. येत्या चार दिवसांत तेथील आपल्या शेड, टपऱ्या व हातगाड्या हटवाव्यात; अन्यथा महामार्ग विभाग तेथील अतिक्रमण काढेल, असा इशाराही देण्यात आला आहे. ऐन पावसाळ्यात कारवाईची टांगती तलवार उभी राहिल्याने येथील विक्रेते अडचणीत सापडले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:05 PM 08/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow