...अखेर आरटीई प्रवेशाच्या यादीला मुहूर्त

Jul 23, 2024 - 09:58
 0
...अखेर आरटीई प्रवेशाच्या यादीला मुहूर्त

रत्नागिरी : राज्यशासनाने आरटीई प्रवेश पद्धतीत बदल करणयासाठी ९ फेब्रुवारीला काढलेली अधिसूचना न्यायालयाने रद्द केल्याने दीड महिन्यांपासून रखडलेली प्रवेश प्रक्रियेचा मार्ग खुला झाला आहे. सोमवारी यादी जाहीर झाली आहे. ८१२ जागांसाठी ५७० जणांचा यादीमध्ये समावेश आहे.

आरटीई अंतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के रिक्त जागांवर प्रवेश देण्यासंदर्भात खासगी शाळांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. परिणामी, मागील दीड महिन्यांपासून प्रवेश प्रक्रिया रखडली होती. यावर मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी आरटीई प्रवेश पद्धतीत बदल करण्यासाठी काढलेली अधिसू‌चना न्यायालयाने या केल्याने पालकांना दिलासा मिळाला आहे. जुलै महिना अर्धा होवूनही प्रवेश प्रक्रिया सुरु झाली नसल्याने पालक, विद्यार्थी आरटीई प्रवेश प्रक्रियेकडे डोळे लावून बसले होते. आता मात्र मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्ह्यात ९७ शाळांमध्ने ८७२ जागा आहेत. यासाठी ७७७ अर्ज दाखल झाले होते. याची छाननी करण्यात आली. यानंतर ५७० अर्ज वैध ठरवण्यात आले. यामुळे या सर्वांची यादी सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली.

प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या पालकांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर सोमवारपासून एसाएमएस पाठवण्यास सुरुवात झाली आहे. आरटीई २५ टक्के प्रवेश मिळाल्याचा एसएमएस प्राप्त झालेल्या पालकांनी दि. २३ जुलै ते दि. ३१ जुलै २०२४पर्यंत आपल्या जिल्ह्यातील संबंधित तालुकास्तरावरील पडताळणी समितीकडे कागदपत्रांची पडताळणी करून पडताळणी समितीमार्फत आपल्या बालकांचा प्रवेश निश्चित करण्यात येणार आहे.

पालकांनी आरटीई पोर्टलवरील सर्वाची स्थिती या टॅबवर आपल्या बालकांचा अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती पडताळावी. वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन पालकांनी करावे. बी. एम. कासार, शिक्षणअधिकारी, जि. प. रत्नागिरी.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 AM 23/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow