रत्नागिरी : किमान वेतन, अंशकालीन नावात बदल करण्याची जिल्हा परिषद महिला परिचर महासंघाची मागणी

May 29, 2024 - 11:31
 0
रत्नागिरी : किमान वेतन, अंशकालीन नावात बदल करण्याची जिल्हा परिषद महिला परिचर महासंघाची मागणी

रत्नागिरी : जिल्हा परिषद महिला परिचर महासंघातर्फे अंशकालीन महिलांना किमान वेतन मिळावे, तसेच अंशकालीन नावात बदल करावा, या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आले आहे. जि. प. चे आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्षा आकांक्षा कांबळे उपस्थित होत्या. प्राथमिक आरोग्य केंद्रात व उपकेंद्रात अंशकालीन महिला परिचर सेवेत असून, फक्त ३ हजार रु. मानधनावर आहेत. काम करत आहेत. दिवसेंदिवस महागाई वाढत असून, त्यामुळे उदरनिर्वाह करणे कठीण जात आहे. त्यामुळे किमान २१ हजार रुपये मानधन मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रमुख मागणीबरोबरच अंशकालीन नावात बदल करण्यात यावा. दरवर्षी गणवेश मिळावा, दरवर्षी भाऊबीज किमान २ हजार रु. मिळावी, मानधन १ तारखेला करावे, अशी मागण्या करण्यात आल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 AM 29/May/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow