नाणीज येथे दारूविक्रीवर पोलिसांची धाड

May 31, 2024 - 11:10
 0
नाणीज येथे दारूविक्रीवर पोलिसांची धाड

रत्नागिरी : तालुक्यातील नाणीज तळवाडी ते घडशीवाडी येथील जंगलमय भागात विनापरवाना हातभट्टीची दारू विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ५१० रुपयांची पाच लिटर दारू पोलिसांनी जप्त केली. 

ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (ता. २२) निदर्शनास आली. या प्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल अजय कांबळे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अंमलदार करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 31-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow