मोदींना सत्ता आणायला छत्रपती लागतात, पण अरबी समुद्रात भूमिपूजन करून शिवरायांचे स्मारक होत नाही; मनोज जरांगेंची टीका

Jul 24, 2024 - 11:48
 0
मोदींना सत्ता आणायला छत्रपती लागतात, पण अरबी समुद्रात भूमिपूजन करून शिवरायांचे स्मारक होत नाही; मनोज जरांगेंची टीका

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अंतरवली सराटीत उपोषण थांबवलं असून त्यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PMNarendra Modi) जोरदार टीका केलीय.

मोदींना सत्ता आणायला छत्रपती लागतात पण अरबी समुद्रात भूमिपूजन करून शिवरायांचे स्मारक होत नाही. असं म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. छत्रपतींचा महानाट्य दाखवलं म्हणजे गुन्हा केला का? असं सवाल त्यांनी केलाय.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी 20 जुलैपासून आमरण उपोषणाला जालन्यातील अंतरवली सराटीत सुरुवात केली होती.आज या आंदोलनाचा पाचवा दिवस असतानाच त्यांनी हे उपोषण स्थगित करणार असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मनोज जरांगेचं टीकास्त्र

दरम्यान मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरून पंतप्रधान मोदींना घेरल्याचं पाहायला मिळालं. सत्ता आणायला मोदींना छत्रपती लागतो आणि समुद्रातच स्मारक होत नाही. भूमीपूजन करायला जमतं असं म्हणत छत्रपतींचा इतिहास दाखवला तर सांस्कृतिक मंत्रालयाला ते पैसा भरता येत नाही का? असा सवाल त्यांनी केला.

छत्रपती अडचणीत आणण्याची परंपरा फडणवीस जपतात

मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका नाटकाच्या प्रयोगाचा आयोजन केलं होतं. यासाठी नाट्य निर्मात्याला पूर्ण पैसे न दिला प्रकरणे पुण्यातच जरांगेंविरुद्ध गुन्हाही दाखल झालाय. दरम्यान, एकदा पीक विम्याचे पैसे मी म्हातार्याला न विचारता नाटकाला दिले होते असं म्हणत छत्रपती अडचणीत आणण्याची परंपरा फडणवीस जपत आहेत. असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.

देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका

बीडच्या नेत्याचं पण तसेच केलं त्यांच्याच बापाने भाजप वाढवली त्यांनाच पाय खाली चिरडलं. ज्याच्या बापाने भाजप वाढवलं त्यांनाच या देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) संपवलं, मराठ्यांच्या ओडताणीमुळे त्यांचा दहा वर्षाचा वनवास तरी संपला. हे देवेंद्र फडणवीस डाव खेळतात एवढ्या नीचपणाने सत्ता आणून तुमच्या कुटुंबाला फडणवीस काय सुख मिळणार आहे? अशा शब्दांत जरांगेंनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.

छत्रपतींचा इतिहास दाखवला तर गुन्हा केला का?

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी पंतप्रधान मोदींवरच आता टीका केली आहे. सत्ता आणायला छत्रपती लागतात पण अरबी समुद्रात त्यांचं स्मारक होत नाही अशी टीका मनोज जरांगे यांनी केली आहे. दरम्यान, छत्रपतींचा इतिहास दाखवला तर गुन्हा केला का? असा सवाल करत याचे पैसे सांस्कृतिक मंत्रालयाला हे पैसे भरता येत नाहीत का? असं मनोज जरांगे म्हणालेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:16 24-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow