सातारा : कृष्णा नदीवरील बंधारा गेला वाहून

Jul 24, 2024 - 12:23
 0
सातारा : कृष्णा नदीवरील बंधारा गेला वाहून

सातारा : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यानच, कृष्णा नदीवरील भुयाची वाडी ता. कऱ्हाड येथील बंधाऱ्याचा काही भाग वाहून गेला.

या बाबात जलसंपदा विभागाने तात्काळ आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहनही करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी घरांची पडझडही झाली आहे.

कोयनेतून विसर्ग सुरू; धरण पाणीसाठा ६५ टीएमसीजवळ..

जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस असून २४ तासांत कोयनाला १६४ तर नवजा येथे १४५ मिलीमीटर पर्जन्यमान झाले, तसेच कोयना धरणातही पाण्याची चांगली आवक आहे. त्यामुळे पायथा वीजगृहातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या एक युनीट सुरू असून, त्यातून १ हजार ५० क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

साताऱ्यात उघडझाप..

सातारा शहरात तीन दिवसांनंतर पावसाचा जोर कमी झाला आहे. मंगळवारी सकाळपासून पावसाची उघडझाप सुरू होती, तसेच ढगाळ वातावरण तयार झालेले. त्याचबरोबर जावळी, वाई, महाबळेश्वर तालुक्यातही पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. तर माण, खटाव, फलटण, खंडाळा, कोरेगाव तालुक्यात कधीतरी रिमझिम स्वरूपात पाऊस पडत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 24-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow