गुहागरला हाऊस बोटीसाठी १ कोटी मंजूर : पालकमंत्री उदय सामंत

Jul 24, 2024 - 11:05
Jul 24, 2024 - 13:06
 0
गुहागरला हाऊस बोटीसाठी १ कोटी मंजूर : पालकमंत्री उदय सामंत

गुहागर : हाऊस बोटीचा उपक्रम महिला बचतगटांनी चालवावा, असा आमचा निर्णय झालेला होता. असा महाराष्ट्रातील पहिला उपक्रम रत्नागिरी जिल्ह्यात आपण सुरु केलेला असून माझ्या रत्नागिरी मतदारसंघातील महिला बचतगट ही हाऊस बोट चालविणार आहेत. या उपक्रमासाठी आम्ही गुहागरची निवड केलेली असून जिल्हा नियोजनातून १ कोटी रुपये हाऊस बोटीसाठी मंजूर केल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

गुहागर पं. स. महिला बालकल्याण विभागाच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ पालकमंत्री सामंत यांच्याहस्ते पाटपन्हाळे पूजा हॉल येथे झाला. यावेळी आ. भास्कर जाधव, गुहागर तहसिलदार परिक्षित पाटील, गटविकास अधिकारी प्रमोद केळस्कर, सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री सामंत यांनी आ. जाधवांच्याविषयी म्हणाले, निसर्गाला जसं वाटत होतं की तुम्ही या कार्यक्रमाला यावं तसं नियतीच्या मनात देखील हे होतं की, आपण दोघे एकत्र आल्याशिवाय हा कार्यक्रम होणार नाही, असे मिश्कील प्रतिक्रिया व्यक्त करत शासनाच्यावतीने मी आ. जाधव यांचे कौतुक करतो, असे गौरोउद्गार काढले. तुम्ही या योजनेला पाठिंबा देऊन सर्व आमदारांना हा आदर्श घालून दिला आहे.

राजकारणात विकासाची भूमिका घ्यायची असते तर पालकमंत्री झाल्यापासून प्रत्येक वेळी ती भास्कर जाधव यांनी घेतलेली आहे हे देखील मला प्रामाणिकपणाला त्यांच्या मतदारसंघांमध्ये सांगितलं पाहिजे. जवळजवळ २ हजार २५० आपण मोबाईल देणार आहोत त्याचे टेंडर निघाले आहे. महिन्याभरामध्ये ते मोबाईल ताब्यामध्ये आल्यानंतर ते २२६ अंगणवाडी सेविकांना देण्यात येणार आहे.

माझा जरी अंगणवाडी सेविकांनी सत्कार केला असेल तरी देखील सत्काराला खरा पात्र जर कोण असतील तर त्या अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका आहेत. आपण ऑफलाइन फॉर्म भरून घेतो आणि ते ऑनलाईन केले गेले असतील तर प्रत्येक अर्ज भरण्यामागे ५० रुपये सरकार अर्ज भरुन देणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशांना देत आहे. आ. जाधव यांनी आपण या योजनेचे स्वागत जाहीर झाल्यापासूनच केले असून एकही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही, याची प्रशासनानेही काळजी घ्यावी, असे आवाहन केले.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:32 PM 24/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow