रत्नागिरी डाकघर येथे उद्या वित्तीय समायोजन मेळावा
रत्नागिरी : डाक विभाग, रत्नागिरीवतीने 25 जुलै रोजी रत्नागिरी हेड पोस्ट ऑफीस, गाडीतळ येथे सकाळी 10 ते सायंकाळी 6 वा. या वेळेत वित्तीय समायोजन मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डाक विभागामार्फत करण्यात येत आहे.
ग्रामीण डाक विमा, डाक विमा, इंडिया पोस्ट पेमेंट बँकाच्या सर्व सुविधा, जन सुरक्षा योजना, प्रधानमंत्री किसान योजना खाती, माझी लाडकी बहीण योजना खाती, महिला सन्मान योजना खाती, पोस्ट ऑफीसच्या विविध योजनांची खाती, लहान मुलांचे आधारकार्ड काढणे, अपडेट करणे, आधार कॅम्पमध्ये आधार वरील नाव बदलणे, पत्ता बदलणे, फोटो बदलणे, मोबाईल नंबर लिंक करणे आदी योजनांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी घेता येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:53 24-07-2024
What's Your Reaction?